पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आयुका गेट जवळील प्रवेशद्वारावर सकाळी नऊ ते ११ या वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. गांभीर्याची बाब म्हणजे विद्यापीठातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संशोधक विद्यार्थी आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून नियम धाब्यावर बसवत विरुद्ध मार्गिकेचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे तेथील चौकात वाहतूक कोंडी होत असून, नेहमीच्या या त्रासाला वाहनचालक कंटाळले आहे.
गणेशखिंड येथील विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील चौकात सध्या मेट्रोचे काम चालू असून जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे औंधकडून येणारी जड वाहनांसह बहुतेक चाकरमाने ब्रेमेन चौकातून खडकी मार्गे शिवाजीनगर या रस्त्याचा अवलंब करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऐन रहदारीच्या वेळी विद्यापीठाच्या आयुका गेटसमोर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.
त्यामुळे दोन्ही बाजूला अर्धा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. खेदाची बाब म्हणजे विद्यापीठामध्ये जाणारे बहुतेक कर्मचारी गर्दी दिसल्यास थेट विरुद्ध मार्गिकेचा वापर करतात. पर्यायाने खडकीकडून ब्रेमेन चौकाकडे येणारी वाहतूक अडकते, त्याचबरोबर खडकीकडे जाणाऱ्या वाहनांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
होतंय काय?
कामावर वेळेवर पोचण्यासाठी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकडून वाहतुकीच्या नियमांचा बोजवारा
विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याबरोबरच रस्ता अडवून धरण्याचे प्रकार
वाहतूक पोलिसांना ब्रेमेन चौक सोडून आयुका गेटवर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी यावे लागते
मानवी चुकांमुळे दोन ते तीन तास वाहतूक कोंडी
विद्यापीठात जाणारे कर्मचारी आणि प्राध्यापक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत विरुद्ध मार्गिकेतून आयुका गेटकडे जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. गांभीर्याची बाब म्हणजे पोलिसही अशा वेळी हतबल झालेले दिसतात.
- रमेश जाधव, स्थानिक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.