Jalyukta Shivar sakal
पुणे

Jalyukta Shivar : पुणे जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’च्या दुसऱ्या टप्प्यात जलसंधारणाची ७५९ कामे

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या १८७ गावांपैकी १०३ गावांमध्ये जलसंधारणाची कामे सुरू झाली आहेत. सध्या या १०३ गावांमध्ये मिळून ७५९ कामे सुरू असून या कामांमुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होऊ शकणार आहे.

जमिनीत पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरविणे, भूजल पातळी वाढविणे, गाव व पाझर तलावांची पाणी साठवण क्षमता वाढविणे आदी प्रमुख उद्देशाने राज्य सरकारने अडीच वर्षांच्या खंडानंतर जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे.

या दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील १८७ गावांची निवड करण्यात आलेली आहे. या गावांमधील जलयुक्त शिवार योजनेच्या विविध कामांना पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजुरी दिलेली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील या अभियानाच्या यशस्वितेसाठी मृद व जलसंधारणाच्या कामात सर्व सरकारी यंत्रणांनी लोकसहभागाला प्राधान्य देण्याबरोबरच निमसरकारी आणि खासगी संस्थांचाही सहभाग घेतला आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी निवड करण्यात आलेल्या गावांमधील कामांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

‘जलयुक्त शिवार’ दृष्टीक्षेपात

१८७ - या योजनेसाठी टप्पा दोन अंतर्गत निवडलेली गावे

१८५ - गावनिहाय कृती आराखडे तयार केलेल्या गावांची संख्या

१०६ - कृती आराखड्यास मंजुरी दिलेली एकूण गावे

१०३ - प्रत्यक्षात कामे सुरू झालेली गावे

१५३० - कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील मंजूर कामे

७५९ - प्रत्यक्षात सुरू झालेली एकूण कामे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Politics : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खळबळ! शहराध्यक्ष भगवान भालेराव यांची रिपब्लिकन आठवले पक्षातून हकालपट्टी

IND vs BAN: धावा नाही केल्या तरी काय झालं? Virat Kohli च्या नागीन डान्सवर चाहते खूश, पाहा व्हिडिओ

Bigg Boss Marathi 5: दोनच आठवड्यात Sangram Chougule यांनी घेतला बिग बॉसचा निरोप, कॅप्टन्सी टास्क पडला महागात

Sakal Maratha Samaj: सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल; CM एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाला घालणार घेराव

सत्ताधारी-विरोधक राजकारणात व्यस्त; मुद्द्यापासून वेगळीकडे लक्ष वळवण्याचं काम सुरू, वरळीत राज ठाकरेंचं शरसंधान

SCROLL FOR NEXT