पुणे - कोरोनाच्या हाहाकारात पुणेकरांच्या आरोग्याची खेळ करणाऱ्या आणि जम्बो कोविड केअर सेंटर चालविणाऱ्या "लाइफलाइन'चे काम मंगळवारी अखेर काढण्यात आले. त्याऐवजी "मेड ब्रो' व "रूबी एल केअर' एजन्सी नेमून रुग्णांना सेवा पुरविल्या जाणार आहेत. तसेच, "जम्बो'तील रुग्णांच्या मृत्यूबाबत चौकशीही होणार आहे. या सर्व प्रकाराकडे "सकाळ'ने पहिल्यापासूनच लक्ष वेधले आहे.
वैद्यकीय आणि तांत्रिक क्षमता नसतानाही राजकीय, प्रशासकीय दबावातून "लाइफलाइन'ला काम दिल्याचे उघड झाले आहे. त्यासाठी काही अधिकाऱ्यांनी घाई करीत, निविदा मंजूर केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, जम्बोसाठी नेमलेल्या "मेड ब्रो' आणि "रूबी एल केअर' या एजन्सीकडे प्रत्येकी 400 बेड चालविण्याचे काम दिले आहे. या दोन्ही एजन्सींना बुधवारी (ता. 9) प्रत्यक्ष कामाचा आदेश (वर्क ऑर्डर) मिळणार आहे.
पुण्यात कोरोना रुग्ण वाढताच त्यांच्यावर उपचारासाठी 100 कोटी रुपये खर्चून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर जम्बो कोविड केअर सेंटर उभारले गेले. त्याच्या व्यवस्थापनाची म्हणजे, रुग्णांवरील उपचारासाठी "लाइफलाइन'ची नेमणूक झाली. प्रत्यक्षात रुग्ण दाखल झाल्यानंतर मात्र पुरेसे बेड, त्यासाठी तज्ज्ञ, डॉक्टर व अन्य कर्मचारी नसल्याचे दिसून आले. परिणामी, एवढे पैसे खर्चूनही रुग्णांना वेळेत आणि चांगले उपचार मिळाले नाहीत. तसेच, अनेक रुग्णांचा बळीही गेला. या प्रकाराकडे "सकाळ'ने लक्ष वेधले. त्याचवेळी रुग्णांना ना उपचार, ना साधे जेवणही मिळत नसल्याचे निरीक्षण पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नोंदविले आणि त्यांनीच "लाइफलाइन'वर कारवाईची मागणी "पीएमआरडीए'कडे केली. त्याच दरम्यान, "जम्बो'तील गोंधळाची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी "लाइफलाइन'ला बाजूला करत संपूर्ण यंत्रणाच ताब्यात घेतली.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
एका अधिकाऱ्याचा हस्तक्षेप
"जम्बो'च्या उभारणीपासून त्यासाठी एजन्सी नेमण्याची कामे "पीएमआरडीए'ने केली आहेत. ही कामे देताना एका अधिकाऱ्याने नको तेवढा हस्तक्षेप करीत कंत्राटदाराची नेमणूक केल्याची चर्चा आहे. त्यानंतर उभारणीत "लाइफलाइन'ने पुरविलेल्या सुविधांत अनेक त्रुटी असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळले होते. त्यावर महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतले; तेव्हा "त्या' अधिकाऱ्याने "लाइफलाइन'ची बाजू घेतली होती.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जम्बो कोविड केअर सेंटर चालविण्यासाठी नेमलेली "लाइफलाइन' ही एजन्सी सक्षम नसल्याने त्यांचे काम पूर्णपणे काढले आहे. नव्या एजन्सी नेमून ही सुविधा व्यापक करीत आहोत. यापुढे रुग्णांना अत्यंत चांगली सेवा मिळेल. दोन एजन्सींच्या माध्यमातून "जम्बो'चा उद्देश साध्य होणार आहे.
- डॉ. सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे
जम्बो सेंटरमधील स्थिती
23 ऑगस्ट - "जम्बो'चे उद्घाटन
24 ऑगस्ट - लाइफलाइनला कामाचा आदेश
26 ऑगस्ट - पहिला रुग्ण दाखल
30 ऑगस्ट - पहिले दोन बळी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.