criminal sakal
पुणे

जुन्नर : चार वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोराला अटक

जुन्नर न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली

सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केलेला व मागील चार वर्षा पासून फरार असलेला पारनेर तालुक्यातील कुख्यात दरोडेखोर बाळू उर्फ बाळ्या झारु भोसले ( वय ४५ ) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपीला जुन्नर न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली असून, भोसले याच्या अटकेने खून, दरोडे व जबरीचोरीचे गुन्हे उघड होण्यास मदत होणार आहे. अशी माहिती जुन्नरचे पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली.

जुन्नर व शिरूर तालुक्यात दरोडे टाकून कुटुंबातील सदस्यांना जबरी मारहाण करून बाळू उर्फ बाळ्या झारु भोसले याच्यासह त्याच्या टोळीतील पाच ते सात जण मागील चार वर्षा पासून फरार आहेत. आरोपी सतत ठिकाण बदलून जंगल व डोंगराळ भागात वास्तव्यास असल्याने त्यांचा शोध घेणे अवघड होते. दोन्ही गुन्ह्यांत आरोपींवर मोक्का ( संघटित गुन्हेगारी) कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात आली होती. बाळू भोसले याने सहकऱ्यांच्या मदतीने सन २०१७ मध्ये शिरूर पोलीस स्टेशनहद्दीत तर १४ डिसेंबर २०२० रोजी आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील मंगरूळ येथे दरोडा टाकून रोख रक्कम व दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला होता.

या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.त्या नुसार वेषांतर करून पोलीस आरोपींच्या मागावर होते. बाळू भोसले हा बेल्हे येथे अळकुटी फाट्यावर येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या नुसार मंगळवारी(ता.२४) बाळू भोसले याला अळकुटी फाट्यावर सापळा लावून सिनेस्टाईल पटलाग करून पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, हवालदार दिपक साबळे, हनुमंत पासलकर, विक्रम तापकिर, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, दगडू वीरकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT