Satyashil-Shelkar-and-Atul benke sakal
पुणे

Vidhansabha Election 2024 : जुन्नरला महाविकास आघाडीच्या उमेदवारीची मोठी उत्सुकता

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांच्यासाठी त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेकडे उमेदवारी मागितल्याने उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याची मोठी उत्सुकता वाढली आहे.

दत्ता म्हसकर

जुन्नर - जुन्नर विधानसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुक उमेदवाराबरोबर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे इच्छुक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांच्यासाठी त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेकडे उमेदवारी मागितल्याने उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याची मोठी उत्सुकता वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना तालुक्यातून ५१ हजाराचे भक्कम मताधिक्य मिळाल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून इच्छुकांची मोठी यादी पुढे आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, मोहित ढमाले, तुषार थोरात, ज्येष्ठ नेते अनंतराव चौगुले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज केले आहेत.

निष्ठवतांना उमेदवारी मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्नात आहेत. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष काँग्रेसचे सत्यशील शेरकर यांनी दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा स्वतःला झोकून देऊन प्रचार केला होता. शेरकर यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

शेरकर तुतारी हाती घेणार की काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढविणार हे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. दरम्यान आज ता. ०६ रोजी तालुका काँगेसचे अध्यक्ष व विघ्नहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकरी यांच्या समवेत पुणे येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची जोरदार मागणी केली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी देखील उमेदवारी मागितली आहे.

याच बरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार बाळासाहेब दांगट व तालुका प्रमुख माऊली खंडागळे, संभाजी तांबे प्रबळ इच्छुक असून पक्ष श्रेष्ठींकडे उमेदवारी मागीतली आहे.

विद्यमान आमदार अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहणार असले तरी काही कार्यकर्त्यांच्या काही गटांनी पवार यांची भेट घेऊन बेनके यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. यामुळे शरद पवार कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता वाढली आहे.

माजी आमदार यांनी देखील निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली आहे. सोनवणे अपक्ष लढणार की ऐनवेळी कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घेणार हे स्पष्ट झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

SCROLL FOR NEXT