Sharad Pawar sakal
पुणे

Sharad Pawar : जुन्नर मधील इच्छुकांनी एकत्र बसून एका उमेदवाराचे नाव निश्चित करावे

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. कोल्हे यांना 51 हजार मतांची आघाडी मिळाली. यामुळे जुन्नर तालुक्यातून महाविकास आघाडी मधून सुमारे दहा जण इच्छुक आहेत.

रवींद्र पाटे

नारायणगाव - लोकसभा निवडणुकीतील यशामुळे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्या सहा जणांनी एकत्र बसून एका उमेदवाराचे नाव जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्याकडे द्या. असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. कोल्हे यांना 51 हजार मतांची आघाडी मिळाली. यामुळे तालुक्यातून महाविकास आघाडी मधून सुमारे दहा जण इच्छुक आहेत. आज सकाळी ज्येष्ठ येथे शरद पवार हे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव येथील निवासस्थानी आले होते.

तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून इच्छुक असलेले ज्येष्ठ नेते शरद लेंडे, सत्यशील शेरकर, अंकुश आमले, मोहित ढमाले, तुषार थोरात, अनंतराव चौगुले यांच्याशी संवाद साधला.

मात्र या वेळी त्यांनी अतिशय सावध पवित्रा घेऊन उमेदवारी बाबत कोणालाही आश्वासित केले नाही.पुणे जिल्ह्यात किती जागा लढवायच्या, कोण उमेदवार असणार याबाबत निर्णय झाला नाही. आमच्या पक्षातील अनेक जण इच्छुक आहेत. मात्र जुन्नरच्या जागेवर आपलाच हक्क असल्याचे सूचक विधान त्यांनी या वेळी केले.

इच्छुक असलेल्या सहा उमेदवारांनी एकत्र बसून जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्याकडे अंतिम एक नाव निश्चित करून द्यावे. खासदार डॉ. कोल्हे व आम्ही एकत्र बसून जुन्नर आंबेगाव खेडच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेऊ.

राजकीय चर्चा नाही

आमदार अतुल बेनके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज भेट घेतली. यामुळे इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली. याबाबत बोलताना ज्येष्ठ नेते पवार म्हणाले, स्व. वल्लभशेठ हे माझे मित्र, अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या भेटीबाबत बोलताना पवार म्हणाले.

त्यांचे वडील स्व. वल्लभशेठ हे माझे मित्र होते. आमदार अतुल हा त्यांचा मुलगा आहे. त्यांनी भेट घेतली यात नवीन काय आहे. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी पक्षाचे काम केले. त्यांच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी मात्र आमची आहे.

आमदार अतुल बेनके -

ज्येष्ठ नेते पवार साहेब व आमच्या कुटुंबात चाळीस वर्षे ऋणानुबंध आहेत. त्यांना पहात मी लहानचा मोठा झालो आहे. तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांची भेट घेतली. त्यांचा सत्कार केला. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. आमच्यात पाऊस, पाणी, शेती बाबत चर्चा झाली.जनतेने मला विकास कामासाठी निवडून दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिल्हेवाडी प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांचा,वडज उपसा सिंचन योजनेला ३५ कोटी ५० लाख रुपयांचा, नारायणगाव येथे रुग्णालय उभारण्यासाठी 90 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे. विधानसभा निवडणुकीला दीड ते दोन महिन्याचा अवधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

Latest Maharashtra News Updates : सत्तास्थापनेनंतर पहिलाच निर्णय 'लाडकी बहिणीं'चे पैसे वाढवणार?

IND vs AUS 1st Test: टीम इंडियाचा विजय अन् पाकिस्तानला धक्का; Jasprit Bumrah ने मोडला कपिल देव यांचा विक्रम, ७ मोठे पराक्रम

Eknath Shinde: शिवसेनेच्या प्रकाश सुर्वेंची मागाठाणेत हॅट्‌ट्रिक, जाणून घ्या विजयाची इनसाइड स्टोरी

Sangli Election Results : पालकमंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात? खाडे, गाडगीळ, पडळकर, बाबर यापैकी एकाला मिळणार संधी

SCROLL FOR NEXT