Junnar  sakal
पुणे

Junnar News : ड्रोनच्या गस्ती वरील ग्रामस्थांना मिळाले गारगोटी दगड चोर

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : ड्रोन फिरतात म्हणून रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या ग्रामस्थांच्या हाती ड्रोन ऐवजी गारगोटी दगडाची चोरून विक्री विकणारे चोरटे लागल्याच्या घटनेची जुन्नर तालुक्यात रंगतदार चर्चा होत आहे.

पिंपळगाव सिद्धनाथ ता.जुन्नर येथे ही घटना रविवारी ता.२१ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलीसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असल्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितले.

याबाबतची फिर्याद आकाश ज्ञानेश्वर बेल्हेकर, रा.बोरी खुर्द ता. जुन्नर यांनी दिली असून पोलीसांनी रवी राजू सुरे रा.पिशोर ता.कन्नड जि.संभाजीनगर, सलमान महमूद मोमीन, रा.साकुर ता. संगमनेर जि. अहमदनगर, आयाज रियाज सय्यद रा. बिलाल मज्जिद जवळ अजिंठा ता. सिल्होर जि. संभाजीनगर व फइम करीम खान रा.कलीनदरी मज्जिद जवळ अजिंठा ता. सिल्होर जि.संभाजीनगर ह्या चौघांना आज ता.२२ रोजी पहाटे अटक केली आहे.

पिपंळगाव सिद्धनाथ-विठ्ठलवाडी ता.जुन्नर येथे बेल्हेकर यांचे मालकीचे सानिका स्टोन क्रशर असून येथील दगडाचे खाणीतील दगड काढून ते क्रशरवर आणण्याचे काम राजु सुरे हा कामगार करतो. रविवारी रात्री ता.२१ रोजी पिपंळगाव सिध्दनाथ येथील विजय खंडागळे, संतोष खंडागळे, विक्रम खंडागळे, पोलीस पाटील राजाभाऊ खडागळे, लव्हेश खडागळे व २५ ते ३० ग्रामस्थांनी राजु सुरे यांचा मुलगा रवि यांचेसह तीन जणांना पकडुन ठेवले होते.

यावेळी सुरे हा खाण मालक बेल्हेकर यांच्या परवानगी शिवाय दगडाचे खाणीतून निघणारा शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या गार सदृश्य दगडाची सलमान मोमीन, आयाज सय्यद व फईम खान यांना विनापरवानगी चोरुन विक्री करण्याचा प्रयत्न करताना मिळुन आला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT