pune  sakal
पुणे

जुन्नरच्या बौद्ध लेण्या जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा

जुन्नर भागातील बौद्ध लेण्यांचा समूह देशाचा सांस्कृतिक ठेवा आहे. तो जतन होण्यासाठी त्याचा जागतिक पर्यटनस्थळ म्हणून विकास करा अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जुन्नर भागातील बौद्ध लेण्यांचा समूह देशाचा सांस्कृतिक ठेवा आहे. तो जतन होण्यासाठी त्याचा जागतिक पर्यटनस्थळ म्हणून विकास करा. त्यासाठी आवश्यक विकास निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष, खासदार गिरीश बापट यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. (Pune News)

खासदार बापट यांनी केंद्रीय संस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांची दिल्ली येथे भेट घेतली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसर, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, त्याबरोबरच पुरातन बौद्ध लेण्यांसंबंधी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना माहिती दिली. यावेळी समवेत डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू डॉ. वसंत शिंदे, भाजपचे पुण्यातील चिटणीस सुनील माने होते.

बापट म्हणाले, "जुन्नर हे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेले शहर आहे. सातवाहन काळात हा महत्त्वाचा परिसर होता. नाणेघाट ते पैठण हा सातवाहनकालीन व्यापारी मार्ग होता. म्हणूनच हा भाग, तेथील बौद्ध लेण्या या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविण्याची गरज आहे. त्यासाठी या परिसराला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे लागेल. त्यासाठी निधीची मागणी केली आहे. नाणेघाटसाठी केंद्रीय पुरातत्व खात्याने विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत."

जुन्नर परिसरात दोनशेच्यावर बौद्ध लेणी आहेत. त्या पाच समूहात विभागल्या गेल्या आहेत. हिनायन काळातील या लेण्या आहेत. त्यामुळे त्याचे पौराणिक महत्त्व खूप असल्याने त्याचा विकास झाला पाहिजे. तसेच शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी देखील निधीची मागणी केली असून, किल्ल्यावरील सातवाहनकालीन वारसा संग्रहालयासाठी निधी केंद्र सरकारने उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. शिंदे म्हणाले, "सातवाहन काळात नाणेघाट हा व्यापारी मार्ग होता. तो कल्याणला जोडला गेलेला होता. याबरोबरच परिसरातील बौद्ध लेण्यांचे जतन होण्याची गरज आहे. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. त्याचा विकास केला, तर हा सर्वच परिसर पर्यटन‌ स्थळ म्हणून जागतिक नकाशावर येईल. यातून परिसरातचा आर्थिक विकासही साधला जाईल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: जळगावमधील उमेदवार गिरीश महाजन यांनीही केलं मतदान

Voting Percentage: दुपारी १ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर; महाराष्ट्र की झारखंड, मतदानात कोण ठरला मोठा भाऊ?

Adani Group: अदानी समूह देणार रिलायन्सच्या जिओ वर्ल्ड सेंटरला टक्कर; मुंबईत उभारणार सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर

Assembly Election Voting 2024: ऐन मतदानाच्या दिवशी महाविकास आघाडीत फूट, उद्धव ठाकरेंना टेन्शन...काँग्रेसने भूमिका बदलली?

गोड पण गूढ पण! प्रसाद ओक, स्वप्निल जोशी आणि शिवानी सुर्वेच्या '‘जिलबी’चा पोस्टर रिलीज; 'या' दिवशी येतेय भेटीला

SCROLL FOR NEXT