Kadamwakvasti Gram Panchayat in Haveli taluka will transformed into Nagar Panchayat Gauri Gaikwad Ashok Pawar pune sakal
पुणे

हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये हाेणार!

कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांनी मांडलेल्या ठरावाला शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचे समर्थन

सकाळ वृत्तसेवा

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याबाबतचा ठराव गुरुवारी (ता. ०९) पार पडलेल्या वादळी ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पालखीस्थळ या ठिकाणी सरपंच गौरी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांच्यात विकासकामांवरून जोरदार शाब्दिक खडाजंगी उपस्थित नागरिकांना पहायला मिळाली.

कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांनी मांडलेल्या ठरावाला शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचे काही समर्थक व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने हा ठराव मंजूर होतो की नाही याबाबत सांशकता निर्माण झाली होती. मात्र गौरी गायकवाड व चित्तरंजन गायकवाड यांनी नगरपंचायत होण्यापाठीमागचे फायदे व तोटे उपस्थित नागरिकांना समजून सांगितल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी व माजी सरपंच नंदू काळभोर यांच्या विरोधानंतरही ठराव मंजूर झाल्याची घोषणा सरपंच गौरी गायकवाड यांनी केली शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी काही दिवसांपूर्वी पूर्व हवेलीतील लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या गावांचा नगरपंचायत तर उरुळीकांचन ग्रामपंचायतीचा नगर परिषदेत समावेश करावा अशी मागणी शासनाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर कदमवाकवस्ती येथे ग्रामसभा बोलावण्यात आली होती.

यावेळी सरपंच गौरी गायकवाड, माजी सरपंच नंदू काळभोर, उपसरपंच बाबाराजे काळभोर, साधना बँकेचे संचालक सुभाष काळभोर, माजी उपसरपंच सुनील कदम, चित्तरंजन गायकवाड, भाजपाचे उपाध्यक्ष प्रवीण काळभोर, शिवाजी काळभोर, मयूर कदम, ग्रामपंचायत सदस्य नितीन लोखंडे, वंदना काळभोर, मंदाकिणी नामुगडे, रुपाली कोरे, शरीफ पठान, मुकुल काळभोर, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबाबत माजी सरपंच नंदू काळभोर म्हणाले, "हा ठराव बहुमताने नामंजूर करण्यात आला आहे. नगरपंचायत करायची असेल तर सर्व सामान्य नागरिकांशी चर्चा करून नगरपंचायतीचे फायदे - तोटे सांगावे. जर नागरिकांना नगरपंचायत करणे योग्य वाटत असेल तर आम्ही सर्वजन नागरिकांच्या निर्णयासोबत आहोत. तसेच हा ठराव स्थगीत करण्यात आला आहे."

याबाबत गौरी गायकवाड यांनी ठराव मांडताच करताच माजी सरपंच नंदू काळभोर, भाजपाचे प्रवीण काळभोर, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष कदम, साधना बँकेचे संचालक सुभाष काळभोर, सुनील कदम, मयूर कदम यांनी नगरपंचायततिला विरोध केला. यावेळी शाब्दिक खडाजंगी पहायला मिळाली. या गोंधळात ग्रामविकास अधिकारी यांनी ए. एम. घोळवे हे निघून गेले. यावेळी गौरी गायकवाड यांनी हा ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली.

सरपंच गौरी गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांचे नगरपंचायत करण्याबाबतचा ठराव मंजूर झाल्याबाबत जाहीर केले असले तरी नंदू काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी फेटाळला असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत जनतेशी संवाद साधणार असून त्यानंतरचा आम्ही आमची भूमिका जाहीर करू अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

Farmer : भरपाईपासून ५० हजार शेतकरी वंचित,गतवर्षी रब्बी हंगामात झाले होते पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT