Pune Kalamodi Dam Sakal
पुणे

Pune Kalamodi Dam : कळमोडी धरण शंभर टक्के भरले, सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग आरळा नदीत

राजेंद्र लोथे

चास : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील आरळा नदिवर असणारे कळमोडी धरण शंभर टक्के भरले असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग आरळा नदिपात्रात होण्यास सुरूवात झाली आहे, मागील वर्षी धरण १७ जुलै रोजी शंभर टक्के भरले होते मात्र चालु वर्षी धरण चार दिवस उशीरा म्हणजे २१ जुलै रोजी भरले आहे.

चास कमान धरणाच्या पाण्यापासून वंच्छित राहिलेल्या खेड तालुक्यातील गावांसह आंबेगाव तालुक्याच्या सातगांव पठार भागास वरदान ठरणारे हे धरण शुक्रवार ता.२१ रोजी पुर्ण क्षमतेने भरताच धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली.

या धरणात २०१० पासून पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यास सुरूवात झाली असून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणास कोणत्याही प्रकारचे दरवाजे नसून धरण भरताच सांडव्यावरून पाणी वाहण्यास सूरूवात होते.

कळमोडी धरण परिसरात पावसाचा जोर गेली काही दिवसांपासून कमी जास्त होत होता, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गाव व परिसरात पावसाचा जोर बऱ्यापैकी राहिल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होवून धरण शंभर टक्के भरले.

धरणाच्या सांडव्यावरून 32 कयुसेक्स वेगाने पाणी आरळा नदिपात्रात विसर्ग होत असून पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वेगाने होणार असल्याने नदिकाठच्या गावांना सावधानतेचा ईशारा देण्यात आला असल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. धरण पातळीवर उप विभागीय अभियंता डी. एस. डिग्गीकर, सहाय्यक अभियंता एस. एस. सुसुंद्रे, कर्मचारी रोहिदास नाईकडे, संभाजी बोंबले, शांताराम सातपुते चोवीस तास लक्ष ठेवून आहेत.

धरणात ४२.८७ द.ल.घ.मी. म्हणजेच १.५१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे, मागील वर्षी धरण भरण्यासाठी १७ जुलै हा दिवस उजाडला होता चालू वर्षी २१ जुलै हा दिवस उजाडला म्हणजे चार दिवस उशीरा कळमोडी धरण भरले.

धरण परिसरात एक जुनपासून 446 मीमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. कळमोडी धरण भरल्याने या धरणातून बाहेर पडणारे पाणी चास कमान धरणात येत असल्याने चास कमान धरणातील पाणीसाठा वेगाने वाढण्यास मदत होणार आहे.

या बाबत बोलताना कळमोडी प्रकल्प संघ समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे म्हणाले की चिखलगांव, साकुर्डी देवोशी, कुडे, योणिये, बांगरवाडी या गावांना या धरणाच्या पाण्याचा प्रत्यक्ष फायदा होत असून पश्चिम भागातील अनेक गावाच्या पाणीपुरवठा योजना ह्या कळमोडी प्रकल्पावर अवलंबून असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा या निमित्ताने सुटला आहे.

आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या माध्यमातून नुकतीच धरणाची उंची वाढवण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून त्यामुळे उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई दूर होवून सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT