Kalyani Nagar Accident sakal
पुणे

Kalyani Nagar Accident : नोंदणी न करता वाहने ग्राहकांना देऊ नका ;‘आरटीओ’चा शोरूमवर कारवाईचा इशारा

कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणानंतर अन्य शासकीय यंत्रणांप्रमाणे आरटीओ प्रशासनदेखील जागे झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणानंतर अन्य शासकीय यंत्रणांप्रमाणे आरटीओ प्रशासनदेखील जागे झाले आहे. मोटारीची पुण्यात नोंदणी न झाल्याने वाहन क्रमांक मिळालेला नव्हता. विनानोंदणी व विनाक्रमांकाची ही मोटार शहरात धावत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे आरटीओ प्रशासनाने शहरातील सर्व दुचाकी व चारचाकी वाहन विक्रेत्यांना वाहनांची नोंदणी झाल्याशिवाय ग्राहकांकडे वाहन देऊ नका, असे पत्र पाठवले आहे. तसे न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मोटार वाहन कायद्यानुसार आता वाहनांची नोंदणी व वाहनांना दिला जाणारा क्रमांक याचे काम वाहन विक्रेत्यालाच करावे लागते. अनेकदा याचे पालन होते, तर काही वेळा वाहन विक्रेते ग्राहकांच्या दबावाला बळी पडून वाहनाच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण न होताच वाहन ग्राहकाच्या ताब्यात देतात. पण आता असा प्रकार घडल्यास पुणे आरटीओकडून कारवाई केली जाऊ शकते. तशा आशयाचे पत्रच सर्व वाहन विक्रेत्यांना देण्यात आले आहे.

अपघातग्रस्त वाहनाची तपासणी

पुणे आरटीओच्या तीन मोटार वाहन निरीक्षकांनी अपघातग्रस्त मोटारीची तपासणी शुक्रवारी केली आहे. यात अपघात होण्यापूर्वी गाडीचा वेग किती होता, गाडीत काही तांत्रिक दोष निर्माण झाला होता का ? याची तपासणी केली आहे. ४ दिवसांत याचा अहवाल परिवहन विभागाकडून पोलिसांना सादर केला जाणार आहे.

वाहनाची नोंदणी न होताच वाहन ग्राहकांच्या हाती सुपूर्त करायचे नाही. याचे उल्लंघन झाल्यास कारवाईदेखील केली जाईल, असे पत्र पुणे आरटीओने शहरातील सर्व वाहन विक्रेत्यांना दिले आहे.

- संजीव भोर,

प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी), पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT