Pune Porsche Accident  Sakal
पुणे

Pune Porsche Accident : बंगल्यातील फुटेजची छेडछाड; आरोपी रात्री बंगल्यातून बाहेर पडल्याची नोंद, न्यायालयात माहिती

सकाळ वृत्तसेवा

Pune News : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांच्या बंगल्यात नोंदवही ठेवण्यात आली होती. त्यात अपघाताच्या दिवशी अल्पवयीन आरोपी मोटार घेऊन बंगल्यातून रात्री बाहेर पडल्याचे नमूद आहे.

तेथील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले असून, त्यात छेडछाड केल्याची माहिती सरकारी वकिलांनी शुक्रवारी (ता. २४) न्यायालयात दिली. अल्पवयीन आरोपीचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचा मोबाईल बंगल्यातून जप्त केला आहे. सायबर तज्ज्ञांकडून मोबाईलचे विश्‍लेषण करण्यात येणार आहे.

गुन्ह्याच्या तपासात प्रगती असून अनेक मुद्दे समोर आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकील विद्या विभूते आणि योगेश कदम यांनी न्यायालयास दिली. आरोपींच्यावतीने ॲड. एस. के. जैन, ॲड. सुधीर शहा, ॲड. अमोल डांगे आणि ॲड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.

आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत

अटकेत असलेल्या आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शुक्रवारी (ता. २४) अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात हजर केले होते. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी वाढून द्यावी, अशी मागणी पोलिस आणि सरकारी वकिलांनी केली होती. मात्र त्यांची मागणी ना मंजूर करून न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला आहे.

हे अटकेत

अल्पवयीन आरोपीचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), कोझी पबचा मालक नमन प्रल्हाद भुतडा (वय २५, रा. ए ७, पद्म विलास एन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय ३५, रा. साईसदन ए-२, तुकाईदर्शन, हडपसर),

ब्लॅक पबचा मालक संदीप रमेश सांगळे (वय ३५, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. १०७, पद्मावती हाईट्स, केशवनगर, मुंढवा), कर्मचारी नीतेश धनेश शेवानी (वय ३४ रा. एन आय बी एम) आणि ब्लॅकचा बार काउंटर व्यवस्थापक जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) यांना अटक झालेली आहे.

दारूचे बील ४७ हजार

दुचाकीला धडक देण्यापूर्वी अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्रांनी कोझी आणि ब्लॅक पबमध्ये मद्यपान केले होते, असे पोलिसांच्या तपासून समोर आले. कोझी पबमध्ये मुलगा आणि त्यांच्या मित्रांनी मद्य मागवले होते. त्याचे ४७ हजार ४२ रुपयांचे बिल मुलाने रोख स्वरूपात भरले होते. दारू पिल्यानंतर मुलगा रात्री दोन वाजून ११ मिनिटांनी पबमधून बाहेर पडल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

आतापर्यंत आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

येरवडा पोलिसांनी आतापर्यंत एकूण आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोझी, ब्लॅक पब आणि अग्रवाल यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. किया कंपनीची आठ लाखांची मोटार आहे. नोकियाचा एक हजार ५०० रुपयांचा मोबार्इल आणि ॲप्पलचा एक लाख ४० हजार रुपये किमतीचा मोबार्इल जप्त केला आहे.

तपासातून पुढे आलेल्या बाबी

  • ‘मुलाने गाडी चालवायला मागितल्यास चालवू दे’ अशी सूचना अग्रवाल यांनी चालकाला दिली होती

  • ब्लॅक पबमधील कामगारांनी अल्पवयीन मुलांना टेबलवर मद्य पुरवले

  • दारूचे बिल अल्पवयीन मुलाने भरले

  • अपघातग्रस्त गाडीची नोंदणी झालेली नव्हती

  • ग्राहक न्यायालयात पोर्श मोटारचा दावा सुरू

  • अग्रवाल यांनी मोबाईल लपवला होता

  • पोलिस तपासात अग्रवाल यांनी चुकीची माहिती दिली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

में यूपी से हू; मराठी नही आती...! मुंबई मेट्रोवनमधील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, मराठी एकीकरण समितीकडून करेक्ट कार्यक्रम

Ranji Trophy 2024: साई सुदर्शनचे द्विशतक, Ishan kishan चे शतक, तर वॉशिंग्टन सुंदरची तुफान फटकेबाजी

आणि त्याने लगेच पाण्यात उडी मारली... 'राजा राणी'च्या सेटवर सुरज चव्हाणने वाचवला एकाचा जीव

Worli Assembly Constituency: वरळीत तिरंगी लढतीची शक्यता, आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढणार!

Latest Maharashtra News Updates : सायन-पनवेल उड्डाणपुलाखाली उभारणार स्वच्छतागृहे

SCROLL FOR NEXT