Pune Porsche Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident : 'या' दिवशी ठरणार आरोपींच्या पुढील मुक्कामाची दिशा; मुलाच्या आजोबाकडून अद्याप जामिनासाठी अर्ज नाही!

सकाळ डिजिटल टीम

पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाची येथील बाल न्याय मंडळाने बुधवारपर्यंत (ता. ५) बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Kalyani Nagar Accident Case) बाल सुधारगृहात असलेला अल्पवयीन मुलगा, त्याचे आर्इ-वडील, आजोबा, पब चालक व त्यांचे कर्मचारी आणि ससूनमधील डॉक्टर यांचा पुढील मुक्काम कुठे असणार हे बुधवारी (ता. 5) ठरणार आहे. तर, मुलाच्या आजोबाने अद्याप जामिनासाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे ते न्यायालयीन (Court) कोठडीची मुदत संपेपर्यंत येरवडा कारागृहात (Yerwada Jail) आहेत.

मुलाची सुटका की मुक्काम वाढणार?

पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाची येथील बाल न्याय मंडळाने बुधवारपर्यंत (ता. ५) बाल सुधारगृहात रवानगी केली आहे. सुधारगृहात ठेवण्याची मुदत संपत असल्याने त्याचा तेथील मुक्काम वाढवला जाणार की त्याची तेथून सुटका होणार याचा निर्णय बुधवारी होणार आहे.

पती-पत्नी येरवड्यात जाणार?

अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि आर्इ शिवानी विशाल अग्रवाल यांना येथील विशेष न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याची मुदत बुधवारी संपत आहे. त्यामुळे त्यांना दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. तेथून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात होणार की पोलिसांना दोघांची पोलिस कोठडी वाढवून मिळणार याबाबत बुधवारी सुनावणी होणार आहे.

पब चालकांची होणार सुटका?

अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यास देण्याबरोबरच अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक, कोझी व ब्लॅक पबच्या मालकांसह कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. या गुन्ह्यात आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला तर विशाल अग्रवाल सोडून इतरांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. कोझी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर, ब्लॅक पबचे व्यवस्थापक संदीप रमेश सांगळे, कर्मचारी नीतेश धनेश शेवानी आणि ब्लॅकच्या बार काउंटरच व्यवस्थापक जयेश सतीश गावकर यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे.

पोलिस कोठडीतून येरवडा कारागृहात

अल्पवयीन मोटार चालकाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीत पाच जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कोठडी काळात या गुन्ह्यात पोलिसांना आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले तर या तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ होवू शकते. अन्यथा त्यांना येरवडा कारागृहात पाठवले जार्इल. त्यामुळे पोलिस ठाण्यातील कोठडीतून ते येरवडा कारागृहाच्या कोठडीत जाऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT