Pune Porsche Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याच्या आरोपात अटक; कुटुंबीय म्हणतात, 'अजय तावरेंचा या प्रकरणाशी आणि ललित पाटीलशी...'

Pune Porsche Accident : कल्याणीनगरमध्ये १९ मे रोजी पोर्शे स्पोर्ट्स कार अपघात प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. अपघातानंतर ससून हॉस्पीटलमधील फॉरेन्सिक विभागाच्या प्रमुख म्हणजेच एचओडीसह २ डॉक्टरांना अटक केली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

कल्याणीनगरमध्ये १९ मे रोजी पोर्शे स्पोर्ट्स कार अपघात प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. अपघातानंतर ससून हॉस्पीटलमधील फॉरेन्सिक विभागाच्या प्रमुख म्हणजेच एचओडीसह २ डॉक्टरांना अटक केली आहे. अल्पवयीन आरोपींच्या रक्ताचे नमुने गायब केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याने आरोपीच्या अल्कोहोलचे प्रमाण निश्चित झाले नाही. अपघाताच्या वेळी तो दारूच्या नशेत होता. डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्ताच्या नमुन्यात छेडछाड केल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी डॉ अजय तावरे व डॉ श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणामुळे चर्चेत आलेले डॉ अजय तावरे यांनी यापूर्वी देखील असे अनेक काम केल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. तर या प्रकरणात तावरेंच्या कुंटुबीयांची प्रतिक्रिया समोर आली आहे. " अजय तावरे हे निर्दोष आहेत त्यांनी काहीही केलेलं नाही, तावरेंना अडकवण्यात येतं आहे, ललित पाटील प्रकरणातही त्यांचा काही संबंध नव्हता असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले अजय तावरेंचे कुटुंबीय?

टिव्ही ९ मराठीशी बोलताना तावरेंचे कुटुंबीय म्हणाले, अजय तावरेंवरील आरोपांबाबत आम्हाला पेपरमधून समजलं. ते चुकीचं असं काही करणार नाहीत. ललित पाटील प्रकरणात देखील त्यांचा काही संबंध नव्हता. अजय तावरेंना अडकवण्यात येत आहे. किडनी तस्करी प्रकरणात देखील त्यांचा काही संबध नव्हता, ते रूबीमध्ये होत असल्याचं समोर आलं होतं असंही कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

डॉ अजय तावरे कोण?

डॉ अजय तावरे यांनी यापूर्वी देखील असे अनेक काम केल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. डॉ अजय तावरे हे ससूनमध्ये फॉरेन्सीक लॅबचे प्रमुख आहेत.

२०२२ मध्ये देशभरात किडनी तस्करीची अनेक प्रकरणे समोर आली होती. महाराष्ट्रात देखील असे प्रकार घडले होते. कोल्हापूरच्या सारिका सुतार या महिलेच्या किडनी तस्करी प्रकरणी राज्य सरकारने कारवाई केली होती. पोलिसांनी ससूनचे अधिक्षक डॉक्टर अजय तावरे यांची उचलबांगडी केली होती.

दहा वर्ष डॉक्टर अजय तावरे हे ससून रुग्णालयाच्या अधीक्षक पदावर कार्यरत होते. कोल्हापूरच्या सारिका सुतार ह्या विधवा महीलेची पुण्यातली रूबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी ट्रासंप्लांटसाठी किडनी काढून घेण्यात आली होती. तेव्हा डॉक्टर अजय तावरे हे अवयव प्रत्यारोपण समितीच्या मुख्य पदावर कार्यरत होते.

२०२३ मध्ये पुन्हा अधिक्षकपदी डॉ अजय तावरे-

डॉ अजय तावरे यांची २९ डिसेंबर २०२३ मध्ये अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ किरणकुमार जाधव यांनी त्यांच्याकडे सुत्रे सोपवली होती. तावरे हे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT