Porsche Car Accident esakal
पुणे

Pune Crime : कल्याणीनगर अपघात प्रकरण; अल्पवयीन मुलाला जामीन देणारे जेजेबीचे दोन सदस्य बडतर्फ

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना जेजेबीच्या सदस्यांकडून पुष्कळ चुका राहिल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पबमध्ये मद्यपान करून महागडी मोटार सुसाट चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला वाहतूक सुरक्षिततेवर तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगून तत्काळ जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळातील (जेजेबी) दोन सदस्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. राज्य शासनाने याबाबतची अधिसूचना काढून पदाच्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत ही कारवार्इ केली आहे.

डॉ. लक्ष्मण नेमा धनवडे आणि कविता तुळशीराम थोरात अशी या सदस्यांची नावे आहेत. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना जेजेबीच्या सदस्यांकडून पुष्कळ चुका राहिल्या आहेत, असा अहवाल या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने सादर केला होता. त्यानुसार सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांना चुकांबाबत स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला होता.

सदस्यांचा त्यांचा खुलासा आल्यानंतर आयुक्तालयाने त्यांच्या खुलाशासह स्वतंत्र अहवाल राज्य सरकारकडे पाठविला होता. महिला व बाल विकास विभागाचे उपसचिव आ. ना. भोंडवे यांनी याबाबत अधिसूचना काढली आहे.

चौकशीतून काय समोर आले होते -

मंडळाच्या निर्णयाबाबत चौकशी करण्यासाठी पाच अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली होती. त्या समितीने शंभरहून अधिक पानांचा अहवाल महिला व बाल कल्याण आयुक्तालयाकडे पाठविला होता. अल्पवयीन मुलाला जामीन देताना बाल न्याय मंडळातील एका सदस्याने भूमिका मांडली होती.

ती भूमिका न्याय मंडळासमोर ठेवल्यानंतर दुसऱ्या सदस्याने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे एक सदस्य दोषी नाही तर दुसरा सदस्यही दोषी आहे. मंडळाने निर्णयादरम्यान पुराव्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. तक्रारीतील माहिती विचारात घेतली नाही, अशा अनेक त्रुटी आढळल्या होत्या. त्याचा अहवालात उल्लेख करण्यात आला आहे.

महिला व बाल विकास आयुक्तालयाकडून दोन्ही सदस्यांची चौकशी करण्यात आली होती. त्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने ही कारवाई केली आहे.

- डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, महिला व बाल कल्याण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT