Kalyaninagar Pune Accident  sakal
पुणे

Kalyaninagar Pune Accident : गुगलवरून जगजाहीर,पोलिस मात्र अंधारात;पब चालतात पहाटे पाचपर्यंत

पुण्यातील पब, बार रात्री दीडपर्यंत सुरू ठेवण्याचा आदेश असताना गुगल रिव्ह्यूवर पहाटे पाचपर्यंत सुरू असल्याचे अनेक अभिप्राय तरुणाईने नोंदविले आहेत. हे रिव्ह्यू पाहून तरुण-तरुणींची पावले आपसूकच पबकडे वळत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुण्यातील पब, बार रात्री दीडपर्यंत सुरू ठेवण्याचा आदेश असताना गुगल रिव्ह्यूवर पहाटे पाचपर्यंत सुरू असल्याचे अनेक अभिप्राय तरुणाईने नोंदविले आहेत. हे रिव्ह्यू पाहून तरुण-तरुणींची पावले आपसूकच पबकडे वळत आहेत.

गेल्या काही वर्षांत विमाननगर, खराडी, लोहगाव, बावधन, प्रभात रस्ता, कोंढवा, हिंजवडी, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, वाकड, पिंपळे गुरव आदी परिसरात पबची संख्या वाढू लागली आहे. तेथील पब, बारमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणी आणि आयटी अभियंते शनिवार व रविवारी नशेत बेधुंद असतात.

बहुतांश पब साउंडप्रूफ नसल्यामुळे आवाज बाहेर येतो. त्या मोठ्या आवाजामुळे परिसरातील रहिवाशांची रात्रीची झोप उडाली आहे. याशिवाय वाहतूक कोंडी, मोठमोठ्याने हॉर्न वाजविणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. याविषयी रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात पोलिसांकडून कारवाईचा दिखावा केला जातो. आठ दिवसांत पुन्हा ‘जैसे-थे’ होते, यामुळे रहिवासी हतबल झाले आहेत.

आदेशाला केराची टोपली...

पब, बार रात्री दीडपर्यंत सुरू ठेवण्याच्या पोलिस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. कारण पहाटे पाचपर्यंत पब, बार बिनदिक्कतपणे सुरू राहत असून मद्यविक्री केली जात आहे. त्याचे पुरावे स्वतः ग्राहकांनी गुगल रिव्ह्यूद्वारे दिले आहेत.

...अशी करतात पबची निवड

पब, बारमध्ये जाऊन आल्यानंतर अनेक तरुण-तरुणी गुगल रिव्ह्यूवर अभिप्राय नोंदवितात. त्यात तेथील जेवण, वातावरण, सेवा आदी बाबींचा समावेश असतो. असे रिव्ह्यू बघूनच पब, बारची निवड केली जाते. ज्या पब, बारला सर्वाधिक रिव्ह्यू असतात, त्याला अधिक प्राधान्य दिले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FM Souza: हायकोर्टाने सांगितला कला आणि अश्लीलतेतील फरक; 'लव्हर्स' अन् 'न्यूड' कलाकृती नष्ट करण्यास दिला नकार

Diwali 2024 Reels and Video: 'दिन दिन दिवाळी..' फोटो अन् व्हिडिओसाठी वापरा 'हे' ट्रेंडी कॅप्शन इंस्टाग्रामवर पोस्ट करताच लाईक्स, व्हियूजचा होईल वर्षाव

Jalgaon Crime News : शाळकरी मुलीचे व्हिडिओ व्हायरल करून ‘ब्लॅकमेलिंग’! दोन संशयितांना अटक; मोबाईल जप्त

'शंभूराज देसाईंचा पराभव हेच उद्धव ठाकरेंचं ध्येय'; पाटणमध्ये तिरंगी लढत शक्य? सत्यजित पाटणकर कोणती भूमिका घेणार?

'इंद्रायणी' मालिकेतील अभिनेत्याचा मोठा गौरव; इंदूच्या दत्तोबांची थेट राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी, पोस्ट शेअर करत म्हणाला-

SCROLL FOR NEXT