Kalyaninagar Pune Accident  sakal
पुणे

Kalyaninagar Pune Accident : ...तर पोलिसांवरही कारवाई;फडणवीस

वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार न्यायालयात जाण्यापूर्वी आरोपीविरुद्ध ३०४ कलम लावले आहे. पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नाही. पोलिसांकडून वेगळी वागणूक मिळाली असेल तर सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित पोलिसांना बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज येथे दिला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार न्यायालयात जाण्यापूर्वी आरोपीविरुद्ध ३०४ कलम लावले आहे. पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नाही. पोलिसांकडून वेगळी वागणूक मिळाली असेल तर सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित पोलिसांना बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज येथे दिला.

पुण्यातील ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’च्या घटनेची गंभीर दखल घेत फडणवीस मंगळवारी सायंकाळी थेट पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात दाखल झाले. त्यांनी या गुन्ह्याच्या तपासाबाबत आढावा घेतला. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘पोलिसांनी या घटनेत ३०४ कलम लावले आहे. ३०४ (अ) कलम लावलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी प्रारंभीच कठोर भूमिका घेतली. या गुन्ह्यातील मुलगा १७ वर्षे आठ महिन्यांचा आहे.

निर्भया प्रकरणानंतर कायद्यात झालेल्या बदलानुसार गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलालाही सज्ञान मानण्यात यावे, अशी तरतूद आहे. तसेही पोलिसांनी अर्जात नमूद केले आहे. मात्र बाल न्याय हक्क मंडळाने पोलिसांची भूमिका ऐकून घेतली नाही. त्यांनी सामाजिक सुधारणांसंबंधीचे आदेश दिले आणि त्यातून आणखी जनक्षोभ झाला. पोलिसांनी तत्काळ वरिष्ठ न्यायालयात अर्ज केला असून, न्यायालयाने त्याची दखल घेतली. कायद्यानुसार, बाल न्याय हक्क मंडळाच्या आदेशाबाबत फेरविचार करायचा असेल तर पुन्हा त्याच न्यायालयात जावे लागते. त्यामुळे कायद्यानुसार ती कार्यवाही करण्यात येत आहे. वरिष्ठ न्यायालयाने घेतलेली भूमिका पाहता बाल न्याय हक्क मंडळ फेरविचार करेल, अशी आम्हाला खात्री आहे.’’

अटींचे उल्लंघन करणारे बार बंद करणार

दारू पिऊन लोकांचे जीव घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. या प्रकरणात न्याय निश्चितपणे होईल. बारचे जे परवाने दिले, तेथे परवान्यातील अटींचे पालन होते की नाही, हे तपासण्याचे आदेश दिले आहेत. अटींचे पालन न करणारे बार बंद करण्यात येतील. शिवाय वय आणि ओळख याची पडताळणी केल्यानंतरच बारमध्ये प्रवेश दिला पाहिजे, याचेही काटेकोरपणे पालन करावे. नाकाबंदी करून ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’विरोधी मोहीम नियमितपणे राबवावी. बाल न्याय मंडळाच्या पुढच्या आदेशानुसार या प्रकरणात पुढील कार्यवाही करण्यात येईल.

पत्रकार परिषदेतील फडणवीस यांचे मुद्दे

  • पुण्यात निवासी भागातील पबचा मुद्दा गंभीर

  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब, बार आस्थापना बंद करणार

  • रहिवासी भागात मद्यविक्रीचे (एफएल ३) परवाने यापुढे देऊ नयेत

  • पब, बारमध्ये येणाऱ्यांचे वय आणि ओळखीची पडताळणी करावी

  • आरोपीला पिझ्झा दिल्यासह इतर आरोपांची चौकशी करणार

  • बेकायदा आस्थापनांबाबत अहवाल दिल्यानंतर महापालिकेने कारवाई करावी

  • स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही, याकडे पालकांनीही लक्ष द्यावे

मुलाबाबत आज निर्णय

अल्पवयीन मुलाला आज बाल न्याय हक्क मंडळासमोर हजर करण्यात आले. याबाबतचा निर्णय उद्या (ता. २२) होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT