Kanifnath Dive ghat Malhargarh Fort hilltops flowers  
पुणे

गडकोट किल्ले डोंगरमाथ्यावरील रानफुलांचा बहर मनमोहक

मल्हारगड, कानिफनाथ-दिवेघाटावर अनुभवूया

अशोक बालगुडे

उंड्री : डोंगरमाथा आणि गडकोट किल्ल्यांवरील रानमेवा आणि रानफुलांचा मनमोहक बहर टिकविला पाहिजे. मात्र, अलिकडे विकासाच्या नावाखाली रानमेव्याबरोबर निसर्गातील रानफुले आणिनिसर्गाचे वैभव चिरकाल टिकविण्यासाठी निसर्गप्रेमींबरोबर प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकून काम करण्याची गरज आहे, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले.

मल्हारगड, दिवेघाट, मस्तानी तलाव आणि कानिफनाथ डोंगरावर रानजिरे, सोनेरीला,विष्णुकांत, आभाळी-नभाळी, एक काडी, श्वेतांबरा, नीलावंती, रानतुळस, पुनर्नवा, कानपेट, गोरखमुखी अशा विविध प्रजातींची रानफुलांची पाऊस सुरू झाला की उगवण होते आणि ती बहरलेली पाहताना मन आनंदून जाते. पानफुलांच्या गमतीजमती आणि त्यातील सौंदर्य शहरापासून अवघ्या 10-12 किमी अंतरावर आहे.

भारतीय हवामान, माती, पाऊस रानफुलांना पोषक आहे. श्वेतांबरा, फुलकाडी, रानतुळस, चिरे गुलाब, चिरेपापणी, राननीळ, दीपमाळ, रानहळद, गौरीची फुले, विष्णुकांत व इंद्रगिल अशा अनेक फुलझाडांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. फुलांबरोबर फुलपाखरांची मंजुळ गाणीही ऐकू येतात.

कानिफनाथ आणि मल्हारगडाच्या पायथ्याला ढालतेरेडाबरोबर सोनकी, बरका, मिकी माऊस यांची रेलचेल पाहायला मिळते. राजगड, तोरणा, लोहगड व राजमाची येथेही ऋतुमानानुसार फुलझाडी बहरताना पाहायला मिळतात. प्राणी-पक्ष्यांच्या विष्टेतून किंवा शरीराद्वारे होणारे बीजप्रसार कमी प्रमाणात होत आहे.

वनस्पतींना आवश्यक असणारे मलमूत्र मिळत नाही, त्यामुळे रानफुलांचा प्रसार थांबतो की काय, अशी शंका वाटू लागली आहे. अनेक ठिकाणी प्रदेशनिष्ठ वनस्पती वगवत आहेत. त्या इतरत्र येत नाहीत.

गडकोट किल्ल्यांच्या तटबंदीवर उगवतात, त्याच्या किल्ल्याच्या पायथ्याला उगवत नाहीत. हवामान आणि निसर्गिक परिस्थितीही त्याला कारणीभूत असू शकते, असे निसर्ग अभ्यासक विशाल तोरडे यांनी सांगितले.

वसुंधरा फुलविण्यामध्ये सप्तरंगी पानफुलांबरोबर रानफुलांचा मोठा वाटा आहे. मनमोहक मनाला तजेला देणाऱ्या फुलांविषयी नव्या पिढीपर्यंत माहिती पोहोचविण्याची गरज आहे. रानफुले कोठे आणि कधी फुलतात, कोठे आढळतात याची माहिती शालेय जीवनामध्ये मिळणे आवश्यक आहे.

-दत्तात्रय लांघी, निसर्ग अभ्यासक

पर्यावरणप्रेमींनी ज्या ज्या परिसरात प्रदेशनिष्ठ वनस्पती व दुर्मिळ रानफुलांच्या जाती आढळतात, तेथे त्या जोपासण्याबरोबर वाढविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून काम करण्याची गरज आहे. भावी पिढीसाठी नैसर्गिक संपत्ती जपला पाहिजे. निसर्गातील एक एक प्रजाती टिकविल्या पाहिजेत.

- डॉ. अनिल पाटील, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT