Kasaba Chinchwad By-Election Result esakal
पुणे

Kasaba Chinchwad Vidhansabha Result : उत्सुकता शिगेला; कसबा, चिंचवडचा आमदार कोण होणार?

संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या, अत्यंत चुरशीच्या कसबा पेठ आण चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कोण जिंकणार याची उत्सुकता ताणली गेलेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या, अत्यंत चुरशीच्या कसबा पेठ आण चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कोण जिंकणार याची उत्सुकता ताणली गेलेली आहे.

पुणे - संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या, अत्यंत चुरशीच्या कसबा पेठ आण चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कोण जिंकणार याची उत्सुकता ताणली गेलेली आहे. उद्या (ता. २) या दोन्ही मतदारसंघाची मतमोजणी होणार असून, यात भाजप महायुती जिंकणार की महाविकास आघाडीच्या एकीचा विजय होणार हे स्पष्ट होणार आहे. कसब्याचा अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी चार वाजणार आहेत. तर चिंचवड मतदारसंघ मोठा असल्याने याचा निकाल जाहीर होण्यासाठी किमान १४ तासाचा कालावधी लागणार आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे हेमंत रासने विरुद्ध आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत आहे. चिंचवड मतदारसंघात भाजपच महायुतीच्या उमेदवार अश्‍विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी निवडणूक होत आहे. कसब्याची मतमोजणी कोरोगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात होणार आहे. तर चिंचवडची मतमोजणी थेरगाव येथील शंकर अण्णा गावडे कामगार भवन येथे सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. प्रशासनाची सर्व तयारी झाली असून, सकाळी साडेदहा ११ नंतर कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पण मतमोजणीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून, तपासणी करून, व्हीव्हीपॅटची मोजणी करून अंतिम निकाल जाहीर होण्यास उशीर लागणार आहे.

कसबा मतदारसंघात ५०.०९ टक्के मतदान झाले आहे. पोटनिवडणुकीत ५० टक्के मतदान झाल्याने नेमका फायदा रासने यांना होणार की धंगेकर यांना याकडे लक्ष लागलेले आहे. प्रचारादरम्यान झालेले राजकीय आरोप प्रत्यारोपासह पैसे वाटप, त्यावरून झालेले आरोप, दाखल झालेले गुन्हे यामुळे ही निवडणूक गाजली आहे. भाजप आणि काँग्रेसला मानणाऱ्या भागात चांगले मतदान झाल्याने ही निवडणूक चुरशीची झालेली आहे. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी निकालाआधीच आमदार झाल्याचे फ्लेक्स लावल्याने त्याची चर्चा रंगली आहे. ही उत्कंठा वाढलेली असताना उद्या कसब्याचा आमदार रासने होणार की धंगेकर हे स्पष्ट होणार आहे. कसब्याची मतमोजणी पूर्ण होण्यासाठी २० फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहेत.

चिंचवड मतदारसंघातील मतदारांची संख्या कसब्यापेक्षा दुप्पटीने जास्त आहे. तेथे ५०.४७ टक्के मतदान झालेले आहे. एकूण ३७ फेऱ्यांत मतमोजणी होणार असून, मतमोजणी पूर्ण होण्यास किमान १४ तास लागणार आहेत. चिंचवडमध्ये जगताप, काटे आणि कलाटे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीत ताकद पणाला लावली आहे. यातून जनतेचा कौल कोणाला आहे हे स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT