Kasba By Election sakal
पुणे

Kasba By Election : गणेश मंडळांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य

निवडणुकांमध्ये अनेक घटक परिणामकारक ठरतात. पुणे शहरातील निवडणुका म्हटल्या की सर्वांत आधी लक्ष जाते ते गणेश मंडळांकडे.

गणाधीश प्रभुदेसाई

पुणे : निवडणुकांमध्ये अनेक घटक परिणामकारक ठरतात. पुणे शहरातील निवडणुका म्हटल्या की सर्वांत आधी लक्ष जाते ते गणेश मंडळांकडे. सध्या कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात तर मानाच्या गणपती मंडळांसह अनेक प्रसिद्ध गणेश मंडळे आहेत. अशावेळी निवडणुकांमध्ये मंडळांची भूमिका नेमकी कशी असते व उमेदवारांकडून या मंडळांच्या काय अपेक्षा आहेत, याचा घेतलेला हा आढावा.

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही गणेश मंडळे अस्तित्वात आली आहेत. तरुणाईचे बळ आणि ज्येष्ठांचा अनुभव या वेगळ्या रसायनातून ही मंडळे कार्यरत असतात. यात वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक पार्श्‍वभूमीबरोबरच वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे लोक असतात. त्यामुळे मंडळातून पुढे जाऊन एखादा नेता झाला व तो निवडणुकीत उतरला तर मंडळातील १०० टक्के कार्यकर्ते त्यांच्या मागे जातात, असे होत नाही. तो नेता कसा फायदा करून घेतो हे त्याच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते.

सुमारे ३० वर्षांनी कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्यावेळी गणेश मंडळाचा एक कार्यकर्ता आमदार होणार म्हणून वसंत थोरात यांना मतदारांनी विजयी केले होते. सध्या निवडणूक रिंगणात असलेले भाजप मित्रपक्षाचे उमेदवार हेमंत रासने व महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे अनेक वर्षांपासून गणेश मंडळांशी निगडित असल्याने या पोटनिवडणुकीत रंगत वाढली आहे.

उजवीकडील-डावीकडील

एका मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्याच्या निरीक्षणानुसार सध्या सुरू असलेली पोटनिवडणूक ही शिवाजी रस्त्याच्या उजवीकडील मंडळे व डावीकडील मंडळे अशी विभागली गेली आहेत. उजवीकडील भागात कसबा, शनिवार, नारायण, नवी पेठमधील मंडळांचा, तर डावीकडील भागात नाना पेठ, गणेश पेठेतील मंडळांचा समावेश होतो. मानाची पाच तसेच इतर प्रमुख मंडळे (विसर्जन मिरवणुकीत ज्यांचे आकर्षण असते ती मंडळे) कसबा मतदारसंघात येतात.

बाप्पा हेच सर्वश्रेष्ठ

मंडळात वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते असतात. निवडणूक काळात त्यांच्यावर कसलेच बंधन नसते. ते कोणत्याही उमेदवारासाठी काम करू शकतात. जर मंडळ व्यक्तिकेंद्रित असेल, म्हणजे अध्यक्ष या नात्याने सगळा खर्च ती व्यक्तीच करत असेल तर त्या मंडळाचे कार्यकर्ते ती व्यक्ती सांगेल त्याच्यासाठी काम करू शकते. पण हे थोड्या मंडळांच्या बाबतीत असू शकते. इतर मंडळांत राजकारणाला वाव नाही. राजकारण आणले की ते मंडळ फुटलेच म्हणून समजा. ‘बाप्पा हेच सर्वश्रेष्ठ’ म्हणून मंडळ चालविले जाते, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

मतदार काय बघतात?

- मंडळाची काम करण्याची पद्धत

- अडचणीच्या वेळी धावून येणारे कार्यकर्ते

- निधीचा उपयोग कसा करतात?

- आपल्या भागात काय कामे करतात?

आकडे बोलतात

  • ४५० हून अधिक - कसबा मतदारसंघातील मंडळे

  • सुमारे ४८ - कसबा पेठेतील मंडळे

  • सुमारे ११२ - विश्रामबाग-फरासखाना परिसर

  • १० - दहीहंडी प्रमुख संघ

पोटनिवडणुकीत मतदार थोडा निवांत असतो. सरकारच्या अस्तित्वावर काही परिणाम होणार नसल्याने मतदानासाठी तो उत्सुक किंवा उत्साही नसतो. अशा मतदारांना मतदानाच्या दिवशी घराबाहेर काढून मतदान करून घेण्याचे काम गणेश मंडळे करतात व करू शकतात.

- पीयूष शहा, अध्यक्ष, साईनाथ मंडळ ट्रस्ट, बुधवार पेठ

गणेश मंडळांच्या काही अपेक्षा नसतात. मंडळाशी निगडित किरकोळ कामे करण्यासाठी सहकार्य करावे एवढी माफक अपेक्षा असते. एखाद्या गणेश मंडळाचा कार्यकर्ता आमदार होत असेल तर त्याच्याबद्दल सहानुभूती असतेच.

- विकास पवार, अध्यक्ष, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

गणेशोत्सव मंडळांचा फायदा नेत्यांना होतो; पण नेत्यांच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेचा उपयोग गणेशोत्सवासाठी होत नाही. ‘लोक संघटन’ व ‘प्रबोधन’ या हेतूने मंडळांची स्थापना झाली, तो हेतू साध्य करण्यास मदत करणारे नेते व त्यांचा दृष्टिकोन हवा आहे, तसे होत नाही. गणेशोत्सवानंतर या उत्सवाबद्दल असणारी गौरवशाली परंपरा कुठेच दिसत नाही.

त्यासाठी समर्थ असे एक संग्रहालय हवे आहे. पैशांच्या जोरावर गणेश उत्सवाला ‘इव्हेंट’चे स्वरूप आले. त्यातून बिभत्सता, व्यसनाधीनता वाढली. अशा गोष्टी दूर करण्यासाठी व प्रबोधनाचा हेतू साध्य करण्यासाठी नेत्यांनी दूरदृष्टी दाखवून प्रयत्नपूर्वक एक व्यासपीठ तयार करावे, एवढी अपेक्षा आहे.

- श्रीकांत शेटे, अध्यक्ष, कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

Mumbai Local News: मुंबईकरांनो लक्ष द्या, आज तीन तासांचा ब्लॉक!

Maharashtra Winter Update: थंडीपासून जरा जपूनच, निच्चांकी तापमान 10 अंशांवर; राज्य गारठलं!

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

SCROLL FOR NEXT