पुणे

Kasba Bypoll Election : कसब्यात ट्विस्ट; सोमवारी होणार मनसेच्या उमेदवारांची घोषणा

अक्षय बडवे

येत्या २६ फेब्रुवारी रोजी कसबा आणि चिंचवडच्या जागांसाठी मतदान पार पडणार असून, त्याआधी घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.

हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

तर, दुसरीकडे भाजपकडून कसब्यासाठी आणि चिंचवडसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून कसब्यातून हेमंत रासने तर, चिंचवडमध्ये दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी वैष्णवी जगताप यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

हेमंत रासने हे स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्ष राहिले आहेत. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपकडून टिळक कुटुंबाबाहेरील उमेदवार देण्यात आला आहे.

कसबा पोटनिवडणूक लढण्यासाठी भाजपकडून हेमंत रासने यांच्यासह गणेश बिडकर, धीरज घाटे आणि टिळक कुटुंबातील शैलेश टिळक आणि कुणाल टिळक इच्छूक होते.

भाजपच्या उमेदवारीनंतर आता सर्वांचे लक्ष रासने यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे लागले आहे.

मनसेमुळे येणार ट्विस्ट?

आता या निवडणुकीत मनसेदेखील उतरणार असून, यामुळे कसब्यात आता अधिक ट्विस्ट निर्माण होणार आहे. मनसेकडून सोमवारी (दि. ६ फेब्रुवारी) सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा पोटनिवडणुकीसाठी नावे जाहीर करणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून २ दिवसीय पुणे दौऱ्यावर येणार असून, यादरम्यान ठाकरे शहर कार्यकारणीमधील नेत्यांची बैठक घेणार आहेत. तसेच यावेळी शहर कार्यकारणीने तयार केलेल्या कसब्यासाठीच्या इच्छुकांची यादी राज ठाकरे तपासणार आहेत.

हिंदुत्वाच्या भूमिकेवरुन मनसे कसबा विधानसभा जिंकू शकते असा, विश्वास कार्यकर्त्यांनी दाखवला असून, कसब्यााठी मनसेकडून गणेश भोकरे, अजय शिंदे, गणेश सातपुते, आशिष देवधर आणि निलेश हांडे, प्रल्हाद गवळी, बाळा शेडगे आदींची नावे चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT