कात्रज - महादेवनगर टेकडीवर अनधिकृत प्लॉटिंगवर करण्यात आलेली कारवाई sakal
पुणे

पुणे : कात्रजमध्ये बिडीपी प्लॉटिंगवर धडक कारवाई

सहा एकर क्षेत्रातील काँक्रीट रस्ते, शेड व पाण्याच्या टाक्या तोडण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : परिसरातील टेकड्यांवर बिडीपी आरक्षण असताना अनधिकृतपणे प्लॉटिंग करून सामान्य जनतेची मोठी फसवणूक केली जात आहे. ही बाब लक्षात घेत महापालिकेच्या बांधकाम विभाग झोन २ने बीडीपी आरक्षित जागेत प्लॉटिंग करून विक्री करण्याचा डाव उधळून लावला आहे. कात्रज नवीन हद्दीतील सर्वे क्रमांक ३८ व ४० येथील बीडीपी झोन मधील सुमारे ५ एकर अनधिकृत प्लॉटिंगवर असलेले पत्राशेड, काँक्रिट रस्ते, रिटेनिंग वॉल, पाण्याच्या टाक्या, इलेक्ट्रिक पोल तसेच काही प्रमाणांत असलेल्या पक्क्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे कात्रज परिसरात असलेल्या बीडीपी आरक्षित जागेत प्लॉटिंग करून विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बांधकाम विकास विभागाचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी अभियंता राहुल साळुंखे ह्यांच्या नियंत्रणाखाली उपअभियंता प्रताप धायगुडे, शाखा अभियंता प्रशांत मोरे, कनिष्ठ अभियंता हेमंत कोळेकर, अभिजित भुजबळ, बाळासाहेब बदडे, करण शिर्के, निखिल रोडे यांनी कारवाई केली. चार जेसीबी, चार ब्रेकर, दोन गॅस कटरच्या सहाय्याने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आले आहे. अनाधिकृत प्लॉटिंग किंवा अनाधिकृत बांधकाम केल्यावर स्वतःचे आणि शासनाचे नुकसान आहे. असे केल्यास कारवाई अटळ असून नागरिकांनी अनाधिकृत बांधकाम किंवा प्लॉटिंग असलेल्या खरेदी करु नये असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया

घराचे स्वप्न दाखवत बिडीपी आरक्षित जागा विकून गोरगरीब जनतेची फसवणूक केली जात आहे. ही बाब गंभीर असून नागरिकांनी स्वतःची फसवणूक होऊ देऊ नये. महापालिका नियमितपणे बिडीपी क्षेत्रावर कारवाई करणार आहे. तसेच, आतापर्यंत सूचना आणि नोटीस देण्यात आल्या आहेत. यापुढे अशा प्रकारे अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.

प्रताप धायगुडे, उपअभियंता बांधकाम विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT