Katraj Kondhwa Flyover Issue sakal
पुणे

Katraj News : कात्रज चौकातील उड्डाणपूल अडकला समस्येच्या गर्तेत; भूसंपादनाअभावी अडचणींत वाढ

कात्रज चौकातील भूसंपादनाअभावी याठिकाणी मोठ्या प्रमाणांवर अडचणी निर्माण होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

कात्रज - उड्डाणपुलाच्या कामासाठी चौकातील रखडलेल्या जागांचे भूसंपादनासह विविध समस्यांचे चक्रव्यूह भेदणे अत्यंत गरजेचे आहे. यात अग्रक्रमावर भूसंपादन हे असून चौकातील भूसंपादनाअभावी याठिकाणी मोठ्या प्रमाणांवर अडचणी निर्माण होत आहेत. महापालिका भूसंपादन करण्यात सपशेल अपयशी ठरल्याने ही नामुष्की ओढावली आहे.

मुख्य चौकातील बहुचर्चित गुगळे प्लॉटच्या ४० गुंठे जागेचा दीड वर्षापूर्वी निर्णय होऊनही महापालिकेला जागा ताब्यात घेण्यासाठी अपयश आले आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. चौकातील पिलरवर गर्डर टाकण्यासाठी ही ४० गुंठे जागा ताब्यात घेत वाहतूक वळविणे गरजेचे आहे. त्याशिवाय काम करणे अत्यंत कठीण आहे. चौकात रस्ता रुंदीकरणाअभावी प्रचंड वाहतूककोंडी होते. सदर जागा ताब्यात न आल्यास काम थांबविण्याची वेळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर येऊ शकते.

वाहतूक पोलिसही हतबल

कात्रज चौकातील वाहतूक कोंडीला वाहतूक पोलिसही हतबल झाल्याचे दिसून येते. भारती विद्यापीठ पोलिस कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ही ४३ आहे. यातील सुटीवर आणि कार्यालयीन कामासाठी १० ते ११ कर्मचारी असतात. उर्वरित ३२ पैकी १४ ते १५ वाहतूक पोलिस कात्रज चौक परिसरात असतात.

तर चौकाच्या पर्यायी वाहतूक परिसरात म्हणजेच राजस चौक, वंडरसिटी चौक, दत्तनगर भुयारीमार्ग, सरहद चौक, कात्रज डेअरी, त्रिमूर्ती चौक अशा परिसरात ११ ते १२ कर्मचारी कार्यरत असतात. कात्रज चौकातील वाहतूक कोंडीचा ताण दूर करण्यासाठी ३२ पैकी जवळपास २५ ते २६ कर्मचारी काम करतात. त्यामुळे वाहतूक पोलिस प्रशासनही कात्रज चौकातील कोंडीला हतबल झालेले दिसून येते. मात्र, वाहतूक पोलिसांच्या सहकार्याशिवाय पुलाच्या कामाला गती देता येणे केवळ अशक्य आहे.

पीएमपीकडून सहकार्य अपेक्षित

चौकात येणारी पीएमपीची वाहतूक मोठ्या प्रमाणावर चौकातील जागा व्यापते. त्यामुळे स्वारगेटकडून येणाऱ्या गाड्या कात्रज चौकात न येऊ देता समन्वय साधून त्यांचे विभाजन करणे गरजेचे आहे. शक्य तेवढ्या गाड्या चौकात येण्यापूर्वी काही अतंरावरुन परत वळविणे गरजेचे आहे. तसेच, हिंजवडी, वाकड आदी भागातून नवलेपूलमार्गे येणाऱ्या गाड्यांचीही पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया

संबंधित जागेचे भूसंपादन करण्याची पक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ही जागा ताब्यात येणार असून भूसंपादन विभागाकडून यावर युद्धपातळीवर काम सुरु असून त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. साधारणतः पुढील दोन महिन्यात महापालिकेच्या ताब्यात जागा येईल.

- अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता, पथविभाग

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हे काम संथ गतीने सुरु आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने सर्वांच्या समन्वयाने कामाला गती देणे गरजेचे आहे. हा पूल कात्रजकरांसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे प्रशासनाने नियोजन करून काम पूर्ण करत नागरिकांची यातून सुटका करावी ही आमची मागणी आहे.

- प्रतीक कदम, स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT