Katraj Chowk Traffic Sakal
पुणे

बेशिस्त पीएमपीएल चालकांमुळे कात्रज चौकाला कोंडीचा फास

कात्रज चौकात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. मात्र, यामध्ये पीएपीएलच्या बेजबाबदार वानचालकांमुळे भर पडत आहे.

सकाळ वृत्तसेवा

कात्रज चौकात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. मात्र, यामध्ये पीएपीएलच्या बेजबाबदार वानचालकांमुळे भर पडत आहे.

कात्रज - कात्रज चौकात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. मात्र, यामध्ये पीएपीएलच्या बेजबाबदार वानचालकांमुळे भर पडत आहे. चौकात होणाऱ्या कोंडीमुळे पीएमपीएमएल आगाराकडून येणाऱ्या बसेसना गुजरवाडी बस स्थानकावरून वळवून कात्रज बसथांब्यावर आणण्याचा आदेश आहे. मात्र, पीएमपीएमएल चालकांकडून सर्रासपणे याला केराची टोपली दाखवण्यात येत आहे. पीएमपीएमएल वाहतूक विभागांकडून लावण्यात आलेले बॅरिकेट्स काढून अंतर वाचविण्यासाठी चौकातच बसेस वळवल्या जातात. त्यामुळे कात्रज चौकातील भाजी मंडई व परिसरात वाहतूककोंडी होते.

पीएमपीएमएल चालकांच्या नियम धुडकावण्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागतात. कात्रज चौकात रिक्षा, बसदेखील थांबत असतात त्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात या चौकात गर्दी करतात. त्याचबरोबर, उजवीकडे बसेस व अवजड वाहनांना वळण्यास बंदी असताना त्याचेही पालन होताना दिसत नाही. परिणामी मोठ्या प्रमाणांवर वाहतूक कोंडी होते आणि दोनशे मीटर अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना अर्ध्या तासापेक्षा जास्त कालावधी मोजावा लागतो. कोंढवा रस्ता, सातारा रस्ता, नवले पूल आणि पुणे शहरातून एकाच वेळी येणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. यामध्ये सकाळी आणि संध्याकाळच्यावेळी अधिकची भर पडते. भारती विद्यापीठ पोलिसांकडून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असले तरी त्याला यश येत नसल्याचे स्पष्ट दिसून येते. याबाबत वाहतूक पोलिस आणि पीएमपीएलमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येते.

प्रतिक्रिया

पीएमपीएलच्या नियंत्रकांकडे याबाबत सातत्याने तक्रार केली आहे. मात्र, पीएमपीएलचे चालक ऐकत नाहीत. या तक्रारीबाबत पीएमपीएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करुन तक्रारही केली आहे. मात्र, कोणतीही कारवाई करण्यात आल्याचे दिसून येत नाही. आमचे कर्मचारी त्याठिकाणी नसले की चालक थेट बॅरिगेट्स काढून गाडी वळविण्याचा पराक्रमदेखिल करतात.

- दादासाहेब चुडप्पा, पोलिस निरिक्षक, वाहतूक भारती विद्यापीठ

आम्ही सर्व बसेस गुजरवाडी फाट्यावरून वळविण्याचे नियोजन केले आहे. याबाबत वाहतूक पोलिसांना आणि आमच्या कात्रज आगाराच्या अधिकाऱ्यांना याबाबत पत्र दिलेले आहे. त्यामुळे आता पीएपीएलच्या चालकांकडून असा प्रकार घडणार नाही.

- दत्तात्रेय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएल

पीएमपील चालकांना कुठलाही नियम नाही. ते कुणाला जुमानत नाहीत. सिग्नल तर कधीच पाळताना दिसत नाहीत. पीएमपीएल चालकांच्या मुजोरपणामुळे कात्रज चौकातील वाहतुकीचा वारंवार बोजवारा वाजत आहे. यासाठी कात्रज चौकातून उजवीकडे वळण्यास बसेसना बंदी घालण्याची आवश्यकता आहे.

- योगेश खैरे, स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT