Ajit Pawar sakal
पुणे

Ajit Pawar : कात्रज-कोंढवा रुंदीकरणाला सर्वोतोपरी मदत करणार! पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवार यांचे आश्वासन

कात्रज-कोंढवा रस्त्यावर अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होते. पुढील पन्नास वर्षाचा विचार करून नियोजन करावे लागेल.

अशोक गव्हाणे

कात्रज - कात्रज चौकातील ११०० मीटर उड्डाणपूल पुढे गोकुळनगरपर्यंत १३०० मीटर वाढविण्यासाठी १०० कोटी रुपयांच्या अधिक निधीची गरज आहे. तसेच, कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी जागा मालकांना योग्य मोबदला देऊन भू-संपादन व अन्य कामाला गती देण्याच्या सूचना पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महापालिका प्रशासनाला दिल्या. यावेळी कात्रज-कोंढवा रुंदीकरणाला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे, माजी नगरसेवक प्रकाश कदम यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीवरून पवार यांनी अधिकाऱ्यांसह कात्रज चौकातील उड्डाणपूल व कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण कामाची पाहणी केली. यावेळी आयुक्त विक्रम कुमार,अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कार्यकारी अभियंत्या श्रुती नाईक, सहाय्यक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे, उपअभियंता धनंजय गायकवाड, प्रतिक कदम, उदयसिंह मुळीक, संदीप बधे उपस्थित होते.

कात्रज-कोंढवा रस्त्यावर अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होते. पुढील पन्नास वर्षाचा विचार करून नियोजन करावे लागेल. भूसंपादनासाठी बधे, धारिवाल या जागा मालकांनी सहकार्य केले. तसेच, इतरांनी देखील करावे, महापालिका योग्य मोबदला देईल.

राज्य सरकारकडून मिळणार असलेल्या २०० कोटींचा प्रश्न पत्रकारांकडून उपस्थित केला असता पालिकेने प्रस्ताव पाठवला असून कॅबिनेट मान्यतेसाठी येईल. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून हा प्रश्न मार्गी लावू असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री यांनी रस्त्याची पाहणी असून त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच, राजस सोसायटी चौकातून पुढे उड्डाणपूल वाढविण्यासंदर्भात आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खडीमशीन चौकातून पुढे रस्ता रुंद करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी जागांचा ताबा देण्याऱ्या कुटुंबियांचे त्यांनी आभार मानले.

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

कोंढवा भागासाठी एकेरी वाहतूक

एसबीआय बँक ते खडीमशीन चौक या भागात एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे. खडीमशीन चौकातून कात्रजकडे येण्यासाठी डावी बाजू म्हणजेच नवा रस्ता तर जाण्यासाठी उजव्या बाजूचा म्हणजेच जुना रस्ता वापरण्यात येणार आहे. एकरी वाहतूक केल्यामुळे कामाला गती देण्यासाठी फायदा होणार असून तीन ठिकाणी होणाऱ्या भुयारी मार्गांचे काम एकाच वेळी करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT