शिक्रापूर (जि. पुणे) : केंदूर (ता. शिरूर) येथील सिद्धेश बाळासाहेब साकोरे या युवकाच्या सद्यःस्थिती जगभरातील लागवडयोग्य जमिनींचा पोत ऱ्हास करणाऱ्या कारणांचा शोध आणि त्यावर ठोस उपाययोजनांच्या समस्यांशी लढण्यासाठीच्या केलेल्या नावीन्यपूर्ण उपायांची संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (यूनो) युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशनच्या (UNCCD) प्रतिष्ठित ‘लँड हिरो’ या सन्मानासाठी नुकतीच निवड झाली. या निमित्ताने त्याला जर्मनीत भव्य समारंभात सन्मानित केले.
सिद्धेश केंदूरमधील महादेववाडीतील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात वाढला. इयत्ता दहावी त्याने धामारी (ता. शिरूर) येथे केली, तर पुण्यात मॅकेनिकल इंजिनिअर झाला. त्याने महाविद्यालयीन मित्र जयदीप बबनराव सरोदे याच्यासोबत पाबळ (ता. शिरूर) येथील विज्ञान आश्रमात शेतीशी संबंधित संशोधन केले.
काय आहे प्रयोग?...
सिद्धेश याने जयदीपच्या साथीने सर्वप्रथम शेतीतील पीकपद्धती, माती घटक, पाणी स्थिती, रासायनिक व सेंद्रिय खतांचा वापर याचा वास्तविक अभ्यास करून साध्या उपाययोजना म्हणून शेतीत फळबागा करणे आणि त्यात आंतरपिकांची लागवड करणे एवढ्या सोप्या उपायांनी त्यांनी एक हजार शेतकऱ्यांचा शेतीचा ०.०३ (धोकेदायक पातळी) पासूनचा कर्ब ०.१ (सुरक्षित पातळी)पर्यंत आणून दाखविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.