खडकी बाजार (पुणे) : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने ब्रिटिशांनी वसवलेल्या खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतही पाय पसरले आहेत. खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील 30 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर बऱ्यापैकी रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. काही दिवसांतच खडकी कॅन्टोन्मेंट हा पुण्याच्या नकाशात कंटेन्मेंट झोन (अतिसंक्रमणशील भाग) म्हणून ओळखू लागला. आता खडकीत सद्यस्थितीला फक्त 9 रुग्ण आहेत. 14 एप्रिलपासून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित करून ज्या भागात रुग्ण आहेत तेथून फक्त पाचशे मीटर अंतर पूर्णपणे सील करून, बोर्ड हद्दीतील साप्रस, रेंजहिल, बंगलो एरिया बीइजी आदी भागामध्ये शिथीलता घोषित केली आहे.
असा शिरला खडकीत कोरोना
9 मार्चला पुण्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडला तेव्हा संपूर्ण पुणे शहर ऍलर्ट झाले. 22 मार्चला पुणे शहरात जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली. त्यानंतर 24 मार्च ते आतापर्यंत देशात लॉकडाउन सुरू आहे. 5 एप्रिलला खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत दाट लोकवस्ती असलेल्या हुले रस्ता परिसरातील पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडला. त्यानंतर खडकीत कोरोनाची एन्ट्री झाली. काही दिवसांनी त्याच परिसरातील एकाच कुटुंबातील काही रुग्ण सापडले. काही दिवसांनी दर्गा वसाहत, पोलिस वसाहत, डंकन रोड या परिसरात ही रुग्ण सापडले तेव्हापासून कोरोनाने खडकीत आपला तळ ठोकला आहे.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची रचना
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आठ वॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्डात साधारण चार ते साडेचार हजार मतदार संख्या आहे. एकूण खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रहिवाशांची संख्या 75 ते 80 हजार आहे.
झोपडपट्ट्यांमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज
ब्रिटिशांनी पूर्वी प्रत्येक लष्करी तळाच्या ठिकाणी स्वतः च्या गरजा भागवण्यासाठी सुखसोयींसाठी काही मोहोल्ले वसवले होते. त्यात सुतार, दर्जी, शिंपी, धोबी यांना राहण्यासाठी जागा दिली होती व त्याचा सिव्हिल एरिया म्हणून त्याचा कामकाज पाहण्यासाठी कॅन्टोन्मेंट स्थापन केले. लष्करी हद्दीतील या कामगार वस्तीला सर्व सुखसुविधा कॅन्टोन्मेंट कडून पुरवण्यात येऊ लागले. आजही देशात सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत दर्जिगल्ली, धोबीगल्ली, शिंपी आळी, कसाई मोहल्ला बाजारपेठ पहावयास मिळते. कालांतराने खडकीत लष्कराच्या व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जागेत बेकायदेशीर झोपडपट्ट्या वाढण्यास सुरवात झाली.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
जुन्या झोपडपट्ट्या कारण
खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीत या घडीला दर्गा वसाहत, महादेववाडी, राजीव गांधी नगर, इंदिरा नगर सारख्या मोठ्या झोपडपट्ट्या वसल्या आहेत. दहा बाय दहाच्या घरात सात ते आठ व्यक्ती राहतात. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने या झोपडपट्ट्या बेकायदेशीर असल्याचे सांगत येथील सर्व रहिवाशांची नावे मतदार यादीतून वगळली आहे. मात्र, या झोपडपट्ट्या तीस ते चाळीस वर्षांपूर्वीच्या असल्यामुळे त्याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
बीड, जालना, परभणी, नांदेड उस्मानाबाद या ठिकाणाहून अनेक जण नोकरी धंद्यानिमित्त खडकीतील झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. त्यामुळे खडकी कॅन्टोन्मेंटची लोकसंख्या वाढली आहे. येथील रहिवासी सोशल डिस्टन्स न पाळता घरे छोटी छोटी असल्याने सारखे घराबाहेर पडत असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने पसरण्याची शक्य ता टाळता येत नाही. त्यामुळे यापुढे खडकी कॅन्टोन्मेंट व पोलिस प्रशासनापुढे खडकीतून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार असून त्यासाठी मोठे आव्हान आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.