CM Eknath Shinde sakal
पुणे

CM Eknath Shinde : पुण्यातील पूरग्रस्त भागाला मुख्यमंत्र्यांची भेट; खडकवासला धरणातील विसर्गावरुन केलं मोठं विधान

पुण्यातील पूरग्रस्त भागातील दौरा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडकवासला धरणाच्या सांडव्यावर भेट दिली.

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला - पुणे शहर आणि जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे धरण खडकवासला धरण आहे. सध्याच्या पूरस्थितीत पाणी सोडण्याचे योग्य नियोजन केले आहे. यावेळी, जिल्हाधिकारी, महापालिका व पाटबंधारे विभाग यांच्यामध्ये टीमवर्क आहे. म्हणून हे काम योग्य प्रकारे करता आले. अशाच प्रकारे समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडकवासला धरण येथे पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.

पुण्यातील पूरग्रस्त भागातील दौरा झाल्यानंतर त्यांनी खडकवासला धरणाच्या सांडव्यावर भेट दिली. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी खडकवासला धरण साखळीतील चार धरणात पडणारा पाऊस, त्यानंतर कधी पाणी सोडण्यात येते, याबाबतची सविस्तर माहिती दिली. धरणातून पाणी सोडणे का गरजेचे होते, यासंदर्भात कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांच्या समवेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री तानाजी सावंत खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, पीएमआरडीए चे संचालक रमेश कोंडे, पुणे पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, उपाभियंता मोहन बदाने शाखा अभियंता गिरीजा फुटाणे उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आता खडकवासला धरणातील परिस्थिती नियंत्रणात आहे. धरणातून २१ हजार क्युसेक चा विसर्ग सुरु आहे. परन्तु धरणाची क्षमता आणि पाणी सोडण्याचे प्रमाण याचा ताळमेळ बसवावा लागतो. खडकवासला धरणावर जास्त लोड येतो, येथे कसरत करावी लागते. पाणी सोडलं नाही तर धरणाला धोका होऊ शकतो. असे झाले तर, त्याचा प्रवाह काय असेल, त्या सर्व बाबी लक्षात घेऊन, त्याचा योग्य नियोजन करावे लागते. भविष्यात असे काही होऊ नये. यासाठी या संदर्भात काटेकोर सातत्याने काम करावे लागते.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, खडकवासला धरण हे ब्रिटिशकालीन आहे. पानशेत सोबत १९६१ मध्ये हे धरण ही फुटले. त्यानंतर १९६२ मध्ये त्याची पुनर्बांधणी झाली. खडकवासला धरण साखळीत पानशेत, वरसगाव व टेमघर ही तीन धरणे आहेत. वरील तिन्ही धरणातून पाणी सोडले की, ते पाणी येथे जमा होते. शहर व जिल्ह्याच्या पाण्याचे नियोजन इथूनच केले जाते.

मुख्यमंत्र्यांची सूचना

नदीपात्र खोलवरून करून त्याची वहन क्षमता वाढवता येऊ शकते. असाच प्रयोग आम्ही महाडमध्ये केला आहे. आणि तो यशस्वी झाला आहे. अशाच पद्धतीने या ठिकाणी काही करता येईल का? या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. नदीची पूर रेषा नदीपात्र याबाबत तडजोड करू नये. हे नागरिकांच्या जीवताशी निगडित प्रश्न आहे. असे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT