खडकवासला - हवेली तालुक्यातील गोऱ्हे खुर्द येथील शेतकरी व देवदूत संजय माताळे यांनी केलेल्या धाडसाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. माताळे यांना बैलजोडी खरेदीसाठी आर्थिक मदत म्हणून रोख ५१ हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी सोमवारी जेजुरी येथे जुळवून आणला.
मे महिन्यात गोऱ्हे खुर्द येथे खडकवासला धरणाच्या जलाशयात पोहण्यास काही मुली गेल्या होत्या. त्यावेळी सहा मुली बुडत होत्या. माताळे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बुडणाऱ्या मुलींना सुरक्षितपणे वाचवले होते. दरम्यान, माताळे हे गोऱ्हे खुर्द येथील शेतकरी आहेत. शेतीच्या कामात मदतीसाठी बैलजोडी घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैल जोडी घेण्यासाठी ही आर्थिक मदत केली. अशी माहिती जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी दिली.
यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ.नीलम गोऱ्हे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख व शिवापूरचे सरपंच संजय दिघे, गोऱ्हे खुर्दचे तंटामुक्ती अध्यक्ष कालिदास ढमढेरे उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.