Khadakwasala Dam Water Release Khadakwasala Dam Water Release
पुणे

Khadakwasala Dam Water : खडकवासल्यातील विसर्ग वाढला! @२७०१६ क्युसेक

पानशेत, वरसगाव दोन्ही धरणात सुमारे ९३ टक्के पाणीसाठा कायम ठेवला आहे. परिणामी पडणाऱ्या पावसाचे जमा होणारे पाणी धरणातून सोडण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला - पानशेत, वरसगाव दोन्ही धरणात सुमारे ९३ टक्के पाणीसाठा कायम ठेवला आहे. परिणामी पडणाऱ्या पावसाचे जमा होणारे पाणी धरणातून सोडण्यात येत आहे. सर्वच धरण परिसरात आज दिवसभर जोरात पाऊस पडत आहे. पानशेत धरणातील विसर्ग वाढवल्याने शनिवार, दिनांक तीन ऑगस्ट रोजी खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग २२ हजार क्युसेकहून २७ हजार क्युसेक करण्यात आलेला आहे.

पानशेत येथे सायकांळी पाच वाजता ९.९७ टीएमसी म्हणजे ९३.६७ टक्के धरण भरले आहे. पानशेत मधून एकूण ५८७३ क्युसेक पाणी सोडले आहे. सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पानशेतला ४५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

वरसगावला सायकांळी पाच वाजता ११.९० टीएमसी म्हणजे ९२.८२ टक्के धरण भरले आहे. वरसगाव मधून एकूण ८३०३ क्युसेक पाणी सोडले आहे. सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

टेमघर येथे सायकांळी पाच वाजता ३.६२ टीएमसी म्हणजे ९७.७४ टक्के धरण भरले आहे. या धरणातून वीज निर्मितीसाठी २७५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ३९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

खडकवासला धरणात १.६५ टीएमसी म्हणजे ८३.३१ टक्के पाणीसाठा जमा आहे. कालव्यातून एक हजार पाच क्युसेक तर मुठा नदीत २७ हजार ०१६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. दोन्ही मिळूण या धरणातून २८ हजार ०२१ क्युसेक पाणी धरणातून सोडले जात आहे. सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आठ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

रात्री नऊ वाजता पानशेत मधून ५८७३, वरसगाव मधून ८३०३ क्युसेक तर टेमघर मधून २७५ क्युसेक असे १४ हजार ४५१ क्युसेक पाणी थेट खडकवासला धरणात जमा होत आहे. या व्यतिरिक्त सुमारे १३ हजार क्युसेक खडकवासला पाणलोट क्षेत्रातून पाणी जमा होत आहे. असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

अधिकारी तळ ठोकून

खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरण परिसरात गेली बारा दिवसापासून मुसळधार पावसात पडत आहे. यामुळे खडकवासला पाटबंधारे विभाग वतीने येथील सर्व ठिकाणचे शाखा अभियंता संबंधित धरणावर तळ ठोकून आहेत. पानशेत येथील शाखा अभियंता अनुराग मारके, वरसगावचे शाखा अभियंता विकी राऊत, खडकवासला येथील शाखा अभियंता गिरीजा फुटाणे यांच्यासह त्यांचे कर्मचारी धरणावर तळ ठोकून आहेत.

कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे व उपविभागीय अभियंता मोहन बेदाणे, हे देखील प्रत्येक धरणात पडणारा पाऊस त्यामुळे जमा होणारे पाणी, त्यामुळे सोडावा लागणारा विसर्ग या संदर्भात तिन्ही शाखा अभियंत्यांच्या संपर्कात आहेत.

धरण साखळीत सुमारे ९३ टक्के पाणी जमा झाल आहे. अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे पाटबंधारे चे सर्व अधिकारी कर्मचारी यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. धरणाच्या आतील आणि नदीकाठी राहणाऱ्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे.

- श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT