sharad pawar sakal
पुणे

Khadakwasla News : वांजळे परिवाराच्या सेवाभावी वृत्तीला, शरद पवारांची कौतुकाची थाप

मुलाच्या लग्न सोहळ्यात दिव्यांग, निराधार व गरजवंत अशा १२० कुटुंबाना मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला - खडकवासल्याचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुतणे व जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांनी मुलाच्या लग्न सोहळ्यात दिव्यांग, निराधार व गरजवंत अशा १२० कुटुंबाना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. लग्न सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व‌ खासदार सुप्रिया सुळे यांनी तासभर उपस्थिती होती. पवारांनी वांजळे परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक त्यांनी थाप देऊन केले.

लग्न म्हटले की, सार्वजनिक जीवनातील नावलौकिक जपण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चाचा नवीन पायंडा प्रघात पडत आहे. लग्नातील अवास्तव खर्चाला फाटा देऊन ‘वांजळे आणि काळे’ परिवारातील सोहळा इंद्रायणी तीरी आळंदीतील एका धर्मशाळेत पार पडला.

यावेळी, शेतकरी गणेश लोहार व स्वप्निल भगत यांना प्रत्येकी एक- एक गाय दान केली. कुडजेगावचे अजित पायगुडे व वेळू येथील गोरे महाराज यांना दिव्यांगांची दुचाकी, २५ व्हीलचेअर, १५ वॉकर, ५० श्रवणयंत्र, अंधाची २५ हॅन्डस्टिक, अंधांचे ५० गॉगल, १२ कुबड्या, १२ एलबो स्टिक, नऱ्हे येथील दिव्यांग मुलींची श्री साई संस्थेला ११ हजार रुपये, दिव्यांग व्यक्तींचा आर्केस्ट्रा होता. त्यांना २१ हजार रुपये, मतदार संघातील दिव्यांग महिला पुरुष लग्नाला येऊ शकत नाही. त्यांना घरपोच आहेर म्हणून पूर्ण पोशाख दिला. खडकवासला परिसरातील ५० सांप्रदाय कीर्तनकार यांचा ही सत्कार केला.

समाजाला दिशा देण्याचे काम अनेकजण करतात. त्यातील एक परिवार म्हणजे अहिरेगावचे दिवंगत आमदार रमेश हिरामण वांजळे यांचे कुटुंब. पश्चिम हवेलीतील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील हे एक स्वयंभू कुटुंब. या घराण्याकडे १९८५ पासून २०२४ अशी सलग ३९ वर्षे विविध राजकीय स्तरावरील सत्ता त्यांच्याकडे आहे. शुक्राचार्य यांचे वडील हिरामण वांजळे १९८५ साली सरपंच झाले होते.

शुक्राचार्य वांजळे हे कुस्ती, वारकरी संप्रदायात रमणारं व्यक्तीमत्व. त्यांचा मुलगा सिव्हिल इंजिनिअरचे शिक्षण घेऊन बांधकाम व्यावसायिक सांभाळणारा चि.स्वप्नील.

संजय काळे हे पोलिस अधिकारी. वाघोलीतील प्रतिष्ठित काळे कुटुंब. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर चे शिक्षण घेतलेली चि.सौ.का. सायली‌. स्वप्नील व सायली‌ यांचा लग्न सोहळा सोमवारी आनंदात पार पडला. याप्रसंगी राजकीय, वारकरी, कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा वांजळे, नगरसेविका सायली वांजळे- शिंदे, माजी सरपंच राजेंद्र वांजळे, युवराज वांजळे, आणि विद्यमान सरपंच आरती वांजळे, युवा नेते मयुरेश वांजळे हे उपस्थितांचे स्वागत करण्यात व्यस्त होते.

बंधू दिवंगत आमदार रमेशभाऊ वांजळे यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न होता. लग्नाच्या माध्यमातून अनोखी संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न केला. असे शुक्राचार्य वांजळे यांनी सांगितले.

शरद पवार यांनी सोहळ्यास सुमारे तासभर हजेरी होती. त्यांच्या उपस्थितीत अनेकांना मदत दिली. ते आवर्जून सर्व पाहत होते.

‘खूप छान उपक्रम राबवला.’ असे पवारांनी जाताना शुक्राचार्य वांजळे यांना जवळ बोलवून सांगितले. ‘दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या परिवाराने लग्न सोहळ्याच्या निमित्ताने एक आदर्श लग्न सोहळ्याचा आदर्श पायंडा घातला आहे. याचे अनुकरण करण्याची गरज आहे.’ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

आठवण सोनेरी कामगिरीची

ग्रामपंचायतीत सरपंच, पंचायत समितीत उपसभापती, जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष, नगरसेवक व आमदार की, अशी सत्ता मिळाली आहे. आमदार रमेश वांजळे हे मनसेच्या चिन्हावरून निवडून आले. ते अंगावर सुमारे दोन- तीन किलो सोने परिधान करीत असे. महाराष्ट्रात २००९ मध्ये नवनियुक्त आमदारांनी मराठीतून शपथ घेतली पाहिजे, यावरून झालेल्या गदारोळात. आमदार रमेश वांजळे एका रात्रीत राज्यातील सुपरहिरो ठरले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT