चाकण : खेड तालुक्यातील गौणखनीजाचे विविध गावांत बेकायदेशीरपणे सुरू असलेले उत्खनन काही गावातील खडी क्रशर प्लान्ट बेकायदा चालवले जात आहेत . खडी क्रशर प्लांटसाठी दगडाचे मोठया प्रमाणात उत्खनन करण्यात येत आहे. बेकायदेशीर उत्खनन करण्यासाठी संबंधितांनी कोट्यवधी रुपयांच्या मशिनरी लावल्या आहेत. या मशिनरी उभारण्यापूर्वी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ, जिल्हा गौणखनिज विभागाची परवानगी काहींनी घेतलेली नाही फक्त काही अधिकाऱ्यांच्या हप्त्यावर मशीनरी प्लांट चालतात. यावरून महसूल विभागाचे कामकाज कसे चालते हा मात्र चर्चेचा विषय आहे.
खेड तालुक्यात बेकायदेशीर खनिज उत्खननप्रकरणी महसूल विभागाने केलेली कारवाई निव्वळ मलमपट्टी असते असा आरोप नागरिकांचा आहे.खेड तालुक्याच्या पूर्व तसेच पश्चिम भागात डोंगराळ भागात उत्खनन सुरू आहे. काही बांधकाम व्यवसायिक,कंपन्या, प्लॉट विक्रीचे व्यवसाय करणारे सातत्याने मशिनरी लावून डोंगराचे अहोरात्र लचके तोडत आहेत.वाढत्या डोंगरफोडीमुळे पर्यावरण प्रेमी यांच्याकडुन कडून भविष्यात डोंगरकडे कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे हे भयानक वास्तव आहे. खेड तालुक्यात डोंगरफोडी मुळे मुरूम विक्रीचा व्यवसाय जोरात आहे.याकडे महसूल प्रशासन आणि संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. खेड तालुक्यात पश्चिम डोंगराळ भाग मोठा आहे तसेच पूर्व भागातही डोंगर आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात महाळुंगे, खालुंब्रे,सावरदरी,आंबेठाण,वराळे,शिंदे, वासुली,करंजविहिरे,भांबोली, बिरदवडी, गोनवडी, रोहकल,कोरेगाव,आसखेड,शिवे, वहागाव, कुरुळी,मोई,काळुस, भोसे, रासे,कडाचीवाडी, वाकीखुर्द, वाकीबुद्रुक, मेदनकरवाडी,निघोजे, चिंबळी,आळंदी घाट, केळगाव, वडगाव घेणंद, बहुळ, सिद्धेगव्हाण, चिंचोशी,चऱ्होली, देशमुखवाडी,वांद्रे, पाईट,भामाआसखेड धरण परिसर, धामणे, सोळु, मरकळ, कोयाळी, निमगाव, दावडी भागात मोठ्या प्रमाणात डोंगर फोडून मुरुमाची तसेच दगडाची वाहतूक केली जात आहे.यातून कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे. महसूल प्रशासनाकडे नावाला उत्खननाची परवानगी मागायची नावाला काही रकमेची रॉयल्टी भरायची आणि मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांचा मुरम उचलायचा, दगडाचे उत्खनन करायचे असा अवैध धंदा मोठ्या प्रमाणात मुरूम, दगड विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. बेकायदा मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलीस कारवाई करतात.परंतु इथेही काही प्रमाणात चिरीमिरी दिली जाते. काही राजकीय नेते, काही अधिकारी,कार्यकर्त्यांच्या,गुन्हेगारांच्या आशीर्वादाने अवैध उत्खनन चालते. उत्खनन करणारे व संबंधित काही अधिकारी, तलाठी यांचे वाहनामागे भावही ठरले आहेत अशी ही जोरदार चर्चा आहे.काही लोकांनी उत्खननाबाबत संबंधित तलाठी,मंडलाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर कारवाई करतो असे सांगितले जाते. त्यावर काही कारवाई होत नाही असा नागरिकांचा आरोप आहे.डोंगराच्या कडेच्या कडे तोडल्याने पावसाळ्यात दगड, माती कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते. सध्या अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने बेकायदा उत्खननाला मात्र अहोरात्र जोर आला आहे.
चौकट
कोट्यावधी रुपयांचा महसूल खेड तालुक्यात बुडतो आहे....
चाकण औद्योगिक वसाहत तसेच चाकण परिसर खेड तालुक्यात काही राजकीय तसेच काही अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे डोंगरफोडीचे अवैध धंदे राजेरोसपणे सुरू आहेत. मुरूम चोरीला तसेच दगडाच्या उत्खननाला खेड तालुक्यांमध्ये उत आला आहे.त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा शासनाचा महसूल बुडत आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे असा नागरिकांचा, पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे. खेडचे तहसीलदार,प्रांताधिकारी मात्र म्हणतात आम्ही कारवाई करतो, पण कारवाई मात्र मलमपट्टीची होते हे वास्तव आहे.
....
पुर्ण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.