kiran bhagat mehngai kesari wrestling competition sport Sakal
पुणे

Pune News : किरण भगत ' मेंगाई केसरीचा' मानकरी इराणच्या मल्लावर मात

श्री शिवाजी महाराज कुस्ती आखाड्यावर शनिवार ( ता.०२) रोजी मेंगाई देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य निकाली कुस्ती आखाड्याचे आयोजन

मनोज कुंभार

वेल्हे,(पुणे) : राज्यभरातून नामवंत मल्लांची हजेरी ,हलगी, तुतारीचा निनाद, पैलवानी भारदस्त आवाजाचे निवेदक व आंतरराष्ट्रीय पंच,हजारो कुस्ती शौकिन तसेच दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत किल्ले तोरणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या श्री स्वयंभू मेंगाई देवीच्या आखाड्यात इराणच्या हाद्दी इराणी मल्लावर मात करत उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत याने मेंगाई केसरीवर नाव कोरले.

किल्ले तोरणा गडाच्या पायथ्याशी वेल्हे गावात स्वयंभू मेंगाई देवीच्या ऐतिहासिक यात्रेनिमित्त मंदिरासमोरील प्रांगणात श्री शिवाजी महाराज कुस्ती आखाड्यावर शनिवार ( ता.०२) रोजी मेंगाई देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य निकाली कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पाहिल्या क्रमांक व चांदीच्या गदेसाठी झालेल्या कुस्तीमध्ये हाद्दी इराणी मल्लावर कुंडा डाव करत अंगावर जाऊन चितपट करत पै.किरण भगत याने उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकत मेंगाई केसरीचा किताब पटकाविला.

या कुस्ती आखाड्यामध्ये राज्यभरातील तसेच देश, विदेशी मल्लांनी हजेरी लावली. कुस्ती आखाड्यामध्ये अनेक नेत्र दीपक चित्त थरारक कुस्त्या झाल्या. यामध्ये प्रामुख्याने सागर बिराजदार विरुद्ध हसन पटेल यांची कुस्ती बरोबरीत सोडण्यात आली.

तर दादा शेळके विरुद्ध महेदी इराणी या कुस्तीमध्ये दादा शेळके विजयी झाला तर सतपाल सोनटक्के व भैरू माने या लक्षवेधी कुस्तीमध्ये भैरु माने विजयी झाले .त्याचबरोबर समीर शेख विरुद्ध संग्राम साळुंखे ,वल्लभ शिंदे विरुद्ध समाधान गोरड ,

राघू ठोंबरे विरुद्ध अनिरुद्ध पाटील, मयूर लिम्हण विरुद्ध अभिषेक दाबेकर ,अमोल वालगुडे विरुद्ध सागर कांगुडे याचबरोबर महिलांच्या प्रेक्षणीय कुस्त्या येथे पार पडल्या. कुस्तीचे भारदस्त निवेदन प्रवीण ढवरे पाटील यांनी केले तर दिडशेहून अधिक मल्लांनी या कुस्ती आखाड्यावर हजेरी लावली.

या कुस्ती आखाड्यावर खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे भाजपचे किरण दगडे व देवस्थान ट्रस्टचे प्रकाश पवार,शंकरराव भुरूक,संदीप नगीने , प्रमोद पवार,संजय पवार, ,सुनील भुरुक, सुनील राजीवडे, आनंद देशमाने, राजू पांगारे, संतोष मोरे, मनोज मांढरे,मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कुस्त्या पार पडल्या. यावेळी पंच म्हणून पैलवान भरत शिर्के, शरद पवार, अक्षय नांगरे, गोरक्ष भुरुक,संतोष दसवडकर,विलास पांगारे,लक्ष्मण पवार यांनी काम पाहिले.

तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत आशियाई चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक विजेता धनराज भरत शिर्के,विकास भरम,अमोल वालगुडे,संकेत देवगिरीकर, निखिल काटकर ,धनश्री सनस, निलेश लिम्हण,मंगेश सरपाले, अर्चना पारठे,यांचा देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने आखाड्यामध्ये सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT