Kiran Kulkarni sakal
पुणे

Shikrapur Crime : किरण कुलकर्णी आत्महत्ये प्रकरणातील सर्व सावकार अद्याप फरारी

सावकारांच्या जाचाला कंटाळून केलेल्या आत्महत्येनंतर तब्बल ८ दिवसांनंतरही ११ पैकी एकही आरोपी बेकायदा सावकार पोलिसांच्या हाताला लागले नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

शिक्रापूर - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील किराणा व्यावसायिक किरण सुरेश कुलकर्णी (वय ४८) यांनी ११ सावकारांच्या जाचाला कंटाळून केलेल्या आत्महत्येनंतर तब्बल ८ दिवसांनंतरही ११ पैकी एकही आरोपी बेकायदा सावकार पोलिसांच्या हाताला लागले नाहीत.

पर्यायाने शिक्रापूर पोलिसांनी संपूर्ण हद्दीतील बेकायदा सावकारांची माहिती संकलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, घरातील कारभाऱ्यानेच आत्महत्या केल्याने आपला संपूर्ण किराणा व्यवसायच बंद करण्याचा निर्णय कुलकर्णी कुटुंबाने घेतला.

कोरोना काळात किराणा व्यवसाय अडचणीत आल्याने दिवंगत किरण कुलकर्णी यांनी काही खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले व ते वेळेत परत करता न आल्याने या सर्व ११ सावकारांच्या जाचाला कंटाळून त्यांनी १० तारखेला या सर्वांची नावे व त्यांनी लावलेल्या कर्जव्याजाची टक्केवारी लिहून आत्महत्या केली होती.

याबाबत चिठ्ठीतील नवनाथ भंडारे, संतोष भंडारे, संदीप अरगडे (तिघेही रा. वढू बुद्रुक, शिरूर), सुधाकर ढेरंगे, कांतिलाल रामचंद्र ढेरंगे, अमोल गव्हाणे (तिघे रा. कोरेगाव भीमा, शिरूर), शांताराम सावंत (रा. वाडागाव, ता. शिरूर), अजय यादव, जनार्दन वाळुंज (रा. लोणीकंद, ता. हवेली), जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथील माजी सरपंच किशोर खळदकर, मामा सातव (रा. वाघोली) यांच्यावर शिक्रापूर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे व बेकायदा सावकारकीचे गुन्हे दाखल केले, मात्र यातील अद्याप एकही आरोपी हाताला लागला नाही.

याबाबत पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड व तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक केशव वाबळे म्हणाले, ‘‘चिठ्ठीत उल्लेख केलेलेल्या आरोपींविरोधात सक्षम पुरावे उपलब्ध असून, यातील एकही आरोपीला आम्ही सोडणार नाही. या सर्व ११ आरोपींसाठी एक स्वतंत्र पथक कार्यरत असून, लवकरच काही आरोपी अटक होतील. हद्दीतील प्रत्येक गावात बेकायदा सावकारकी करणाऱ्यांची माहिती आम्ही पोलिस पाटील, स्थानिक ग्रामस्थ व त्रास असलेल्या नागरिकांकडून मागविली असून, नागरिकांनीही न घाबरता शिक्रापूर पोलिसांना कळवावे.’’

दुकान बंद करण्याचा निर्णय

मृत किरण यांनी कर्ज व सावकारांच्या जाचाच्या मानसिक तणावातून आत्महत्या केली होती. त्यांचा किराणा व्यवसाय ते व त्यांचे मधले बंधू रमेश हे पाहत होते. सद्यःस्थितीत किरण याच्या दुर्घटनेनंतर रमेश हेही मानसिक ताणात असून सुरळीतपणे चालू असलेला किराणा व्यवसाय आम्ही पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती किरण यांचे धाकटे बंधू तथा फिर्यादी महेश कुलकर्णी यांनी दिली.

आम्हाला सर्वांत जास्त त्रास सुधाकर व कांतिलाल ढेरंगे यांच्यामुळे झाला असून, उर्वरित नऊ सावकारांची भीती अजूनही आमच्या कुटुंबाला वाटत आहे. किरणच्या आत्महत्येनंतर आरोपींपैकी कुणीही आम्हाला फोन करून त्रास दिलेला नसला तरी भविष्यात हा धोका कायम असल्याचे आम्ही शिक्रापूर पोलिसांना कळविले आहे. पर्यायाने आम्ही वैष्णवी सुपर मार्केट हे किराणा दुकानच बंद करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात; बँक निफ्टी तेजीत, अदानी समूहाचे शेअर्स घसरले

Amravati Assembly Election : अनिश्चिततेचे ढग; बंडखोरांनी बिघडविले गणित...विजयाचा दावा कोणाचाच नाही; मतविभाजन ठरविणार आमदार

Back Pain In Winter: हिवाळ्यात पाठदुखीचा त्रास वाढलाय? पेन किलर न घेता 'या' पद्धतीने मिळवा झटपट आराम

Yavatmal Assembly Election : नेत्यांची राजकीय परीक्षा घेणारी निवडणूक...निकालानंतर अनेकांचा राजकीय प्रवास थांबण्याची शक्यता

Vidarbh Election 2024 : वाढलेल्या टक्केवारीने वाढला संभ्रम....चिमूर, राजुरामध्ये भाकरी फिरणार; उमेदवारांचा विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT