पुणे : पुणे महानगरपालिकेत गेल्या आठवड्यात किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांच निलंबन करण्यात आलं आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या 2 कर्मच्यांचे निलंबन झाले असून, CISF च्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली होती. दिलीप गोरे आणि सतीश शिंदे असे निलंबन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. (Two Police Employee Suspended In Somaiya Case )
'अमिताभ गुप्ता सुटणार नाहीत...'
भाजपनेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज पुन्हा पुणे महानगर पालिकेत (Pune Municipal Corporation) आले त्यावेळी त्यांनी पुण्यात दाखल होताच, पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तसंच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर देखील सोमय्या यांनी गंभीर आरोप केले. वाधवान प्रकरणातून ते सुटले मात्र आपल्याला जीवे मारण्याच्या प्रयत्नातील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते आता सुटणार नाही असं म्हणत त्यांनी पुणे महानगरपालिकेत एवढे गुंड कसे घुसले, पोलीस आयुक्तांना ते दिसत नाहीत का? त्यांना अटक का झाली नाही? असे सवाल गुप्ता यांना उद्देशून केले.
काही दिवसांपूर्वीच सोमय्या पुणे महानगरपालिकेत आल्यानंतर शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली होती. यावेळी ते खाली पडल्याने त्यांच्या हाताला जखम झाली होती. त्यानंतर आज भाजपकडून त्यांचा त्याच ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. आज सकाळपासूनच पुणे महानगरपालिका परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढला आहे. तर काँग्रेसने यावेळी महानगरपालिकेच्या आवारात पक्षाचा कार्यक्रमक घेणं योग्य नसल्याचं म्हणत त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.