suryakant choraghe sakal
पुणे

Dog Life Saving : पालिका कर्मचाऱ्याची 'त्यांच्याशी' असलेली 'तोंड ओळख' आली कामाला

खडकवासला धरणामागे अडकलेल्या चार श्वानांना जीवदान; अग्निशमन दलाच्या मदतीने कर्मचारी उतरला थेट प्रवाहात.

निलेश बोरुडे

किरकटवाडी - सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत खडकवासला येथे घंटागाडीवर चालक म्हणून तैनात असलेले सुर्यकांत चोरघे सकाळी नियमितपणे खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला पुलाजवळील कचरा उचलण्यासाठी गेले होते.

घंटागाडी पुलाजवळ वळवून थांबवल्यानंतर चोरघे यांना श्वानांच्या विव्हळण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी पुलावर जाऊन पाहिले असता खडकवासला धरणातून सुरू असलेल्या जोरदार विसर्गाच्या प्रवाहात मध्यभागी दररोज दिसणारे चार श्वान अडकलेले दिसले.

दररोजच्या भेटीमुळे 'तोंड ओळख' पडलेल्या श्वानांचा आपला जीव वाचविण्यासाठी सुरू असलेला आकांत पाहून चोरघे यांनीही श्वानांना वाचविण्यासाठी धडपड सुरू केली. धरणातून एकविसशे चाळीस क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने पाण्याला वेग होता.

सुरक्षा उपकरणे नसल्याने पाण्यात उतरणे धोकादायक असल्याने चोरघे यांनी पालिका कर्मचारी नरेंद्र दिक्षित यांना याबाबत माहिती दिली. दिक्षित यांनी सकाळ'शी संपर्क साधल्यानंतर सकाळ'च्या माध्यमातून पीएमआरडीएचे विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांना कळविण्यात आले.

अग्निशमन दलाचे जवान सोन्याबापू नागरे, अतुल रोकडे, अक्षय काळे,पंकज माळी, विशाल घोडे, शुभम माळी, श्रीकांत आढाव व किशोर काळभोर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले व रस्सीच्या सहाय्याने श्वानांजवळ जाण्याचा प्रयत्न करु लागले; परंतु भेदरलेले श्वान त्यांच्या जवळ येत नव्हते. सायंकाळपर्यंत प्रयत्न सुरू होते मात्र जवानांना यश येत नव्हते.

अखेर पालिका कर्मचारी सुर्यकांत चोरघे अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने पाण्याच्या प्रवाहात उतरले. चोरघे यांनी नेहमीप्रमाणे आवाज दिल्यानंतर श्वान धावत त्यांच्याजवळ आले! एकेका श्वानाला कडेवर घेऊन चोरघे पाण्याबाहेर आणून सोडत होते. चोरघे आणि श्वानांची केवळ तोंड ओळखीतून झालेली घट्ट मैत्री शेकडो नागरिक पुलावर उभे राहून भावनिक होऊन पाहत होते!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT