Kirkitwadi Road sakal
पुणे

Road Issue : तुम्हीच सांगा या रस्त्यावरून चालायचं कसं?; किरकटवाडीच्या महिलांनी मांडल्या व्यथा

'जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत, काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेले आहे. तुम्हीच सांगा या रस्त्यावरून चालायचं कसं?

निलेश बोरुडे

किरकटवाडी - 'जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत, काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेले आहे. तुम्हीच सांगा या रस्त्यावरून चालायचं कसं? दररोज अनेक महिला दुचाकीवरून पडतात पण कोणाला काही पडलेलं नाही', असे म्हणत खडकवासला व किरकटवाडीच्या महिलांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर व पालिका अधिकाऱ्यांसमोर संतप्त शब्दांत आपल्या व्यथा मांडल्या.

खडकवासला व किरकटवाडी या गावांच्या शीव रस्त्याच्या दुरावस्थेबाबत 'सकाळ'ने लक्ष वेधल्यानंतर चाकणकर यांनी पालिका अधिकाऱ्यांसह प्रत्यक्षात रस्त्याची पाहणी केली व तातडीने दुरुस्ती करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

शीव रस्त्याची सध्या अत्यंत दुरावस्था झाली असून पाऊस सुरू असल्याने रस्त्याला अक्षरशः ओढ्याचे स्वरूप आलेले आहे. रस्त्यावर काही ठिकाणी मोठमोठे डबके साचलेले असून त्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

मागील काही दिवसांमध्ये अनेक महिलांचा या रस्त्यावर अपघात झाला असून पायी चालणे तर अवघड झाले आहे. दहा ते पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या या भागाची व्यथा 'सकाळ'ने सातत्याने मांडली असून लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन यांच्या विरोधात नागरिक अत्यंत तीव्र भावना व्यक्त करत आहेत.

नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शीव रस्त्याची पाहणी केली. यावेळी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे, मुख्य खात्याचे उपअभियंता नरेश रायकर, कनिष्ठ अभियंता राखी चौधरी, आरोग्य निरीक्षक रुपेश मते व इतर अधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चाकणकर यांनी अधिकाऱ्यांसह पूर्ण रस्त्याची पायी चालत पाहणी केली व तातडीने दुरुस्ती संदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

मुख्य समस्या पाण्याची......

शीव रस्त्याची दुरावस्था होण्याचे मुख्य कारण डोंगरावरून येणारे पाणी आहे. डोंगरावर उत्खनन करण्यात आल्याने मागील काही वर्षांपासून पूर्ण पाणी शीव रस्त्यावरुन वाहत आहे. याबाबत शैलेंद्र मते यांनी महसूल विभागाकडे अनेक तक्रारी केलेल्या आहेत मात्र त्याकडे महसूल विभागाने पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे जोपर्यंत पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन होत नाही तोपर्यंत परिसरातील नागरिकांची रस्त्याची समस्या सुटणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT