MPSC Exam sakal
पुणे

MPSC Exam : दुसऱ्या पर्यायांबद्दल न्यूनगंड नको ; किशोर राजे निंबाळकर यांचे ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना आवाहन

बुद्धीचा विकास हा एकांतात होतो, तर चारित्र्याचा विकास हा संगतीत होतो. त्यामुळे इतरत्र वेळ वाया न घालवता स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी स्वतःला काही नियम घालून द्या. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बुद्धीचा विकास हा एकांतात होतो, तर चारित्र्याचा विकास हा संगतीत होतो. त्यामुळे इतरत्र वेळ वाया न घालवता स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी स्वतःला काही नियम घालून द्या. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. जर चौथ्या परीक्षेनंतरही यश मिळाले नाही, तर ‘प्‍लॅन-बी’चा अवलंब करावा. याचा न्‍यूनगंड न बाळगता ती एक संधी म्‍हणून पाहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘स्पर्धा परीक्षा : संधी आणि आव्हाने’ या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, डॉ. व्ही. बी. गायकवाड आदी उपस्थित होते.

निंबाळकर म्हणाले, ‘‘स्‍पर्धा परीक्षेच्‍या तयारीसाठी खासगी क्‍लासेस, मुलाखतीसाठी स्‍वतंत्र क्‍लासेस या सर्वांची आवश्यकता आहे का याचा विचार करावा. स्‍पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात आलेल्‍या उमेदवारांना शहरी वातावरणाशी मिळवून घेण्यासाठी वेळ लागतो. या परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिका स्‍वरूपावरून अभ्यासाची तयारी आपल्‍या गावीही करता येणे शक्‍य आहे. याचा विद्यार्थ्यांनी विचार करावा.’’ कुलगुरुपदाचा प्रवास हा ‘प्‍लॅन बी’मधून झाला आहे, असे सांगून डॉ. संजीव सोनवणे म्‍हणाले, ‘‘नित्‍य नियमाने व्‍यायाम, वाचन व चिकित्सक अभ्यास करणे आवश्यक आहे. स्‍वतःला ओळखा आणि त्‍यादृष्टीने आयुष्याकडे वाटचाल करा.’’

संयोजक राजेश पांडे म्‍हणाले, ‘‘स्‍पर्धा परीक्षेच्‍या उमेदवारांसाठी मुक्‍त विद्यापीठाच्‍या सहकार्याने भविष्यात अनेक योजना करण्याचा प्रयत्‍न आहे. त्‍यातून मदत करण्याची भूमिका आहे. त्‍याच उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.’’ सूत्रसंचालन डॉ. चाकणे यांनी केले, तर आभार व्ही. बी. गायकवाड यांनी मानले.

निंबाळकर म्हणाले...

  • स्वतःमधील न्यूनगंड बाजूला ठेवा

  • संगत चुकली की जगण्याची दिशा बदलत

  • आपण प्रशासकीय सेवेत का जात आहोत, त्‍याचे उद्दिष्ट ठेवून ध्येयाप्रती प्रयत्‍न करा

  • हुशार मित्रांचे समूह तयार करा

  • वर्णनात्‍मक परीक्षेची मानसिकता आतापासून ठेवावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT