Vasant More Sakal
पुणे

Audio Clip Viral : जंगलात जातो म्हणाणाऱ्या वसंत तात्यांना थेट संभाजीराजे छत्रपतींचा फोन; म्हणाले...

थेट छत्रपतींनी कॉल केल्यामुळे वसंत मोरे भावूक झाले आहेत.

दत्ता लवांडे

Maharashtra Politics Update: शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फूट पडल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. अनपेक्षित घडामोडी घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अनेकजण संताप व्यक्त करत आहेत. विरोधातले सत्तेत आणि सत्तेतले विरोधात असा हा राजकारणाचा खेळ पाहून राजकारणीही वैतागले आहेत.

यावरून पुण्याचे मनसे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी "पार पार राजकारणावरचा विश्वास उडालाय राव... लांब कुठं तरी जंगलात जाऊन शेती करत बसावं असे वाटतंय..." अशी फेसबुक पोस्ट टाकली होती. त्यानंतर स्वराज्य पक्षाचे संस्थापक आणि छत्रपती संभाजीराजे यांनी वसंत मोरेंना फोन करून तुम्ही राजकारणात सक्षम राहायला पाहिजे असा विश्वास दाखवला आहे. यासंदर्भातील ऑडिओ क्लीप समोर आली आहे.

"कितीही मनाला पटलं नाही तरी तुमच्यासारखे लोकं राजकारणात सक्रीय पाहिजे. आम्हालाही वाईट वाटतंय पण तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही मजबूत असायला पाहिजे. लोकांनी काही केलं तरी आपण चांगला राहिलं पाहिजे. आपण छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी चालतो."

"तुम्ही चूकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणता आणि तुम्हीच असं जंगलात जाण्याचा विचार केला तर कसं होईल? तुम्ही चांगली भूमिका मांडत असता, तुम्ही राजकराणात सक्रीय राहायला हवं." असा विश्वास आणि वसंत मोरे यांच्या कामाचं कौतुक छत्रपती संभाजीराजेंनी केलं त्यामुळे वसंत मोरे काहीसे भावूक झाले होते.

वसंत मोरे यांनी यासंदर्भातील ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. "याला म्हणतात राजा" असं कॅप्शन टाकून ही ऑडिओ क्लीप शेअर करण्यात आली असून ही ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Breaking News: भोसरीत पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे धागेदोरे पुण्यापर्यंत; कर्वेनगरमधून अटक केलेल्या चौघांची नावे काय?

Vidhansabha Election 2024: "पुतण्याला पुढे करून काकांनी मिळवली उमेदवारी," सोशल मीडियावर नेमकी कुठल्या चुलत्याची चर्चा?

IND vs NZ: पुण्यात कोरड्या खेळपट्टीवर फिरकीचा बोलबाला? आजपासून भारत-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना

Family Shares Dispute: माजी मुख्यमंत्र्यांच्या घरात शेअर्सवरून वाद! आई-बहिणीविरुद्ध कायदेशीर लढाई, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT