Konkan edges of Harishchandragad sakal
पुणे

Pimpalwandi News : हरीश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावरून उडी मारून २३ वर्षीय तरुणीने आपले संपविले जीवन

घाटकोपर, मुंबई येथे राहणारी अवनी भानुशाली या २३ वर्षीय तरुणीने हरीश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून उडी मारून आपले जीवन संपविले.

सिद्धार्थ कसबे

पिंपळवंडी - घाटकोपर, मुंबई येथे राहणारी अवनी भानुशाली या २३ वर्षीय तरुणीने हरीश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून उडी मारून आपले जीवन संपविले.

रविवारी (ता. ७)पाचनई गावातून अवनीने गावातील स्थानिक वाटाड्याला सोबत घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील हरीश्चंद्रगड सर करायला सुरुवात केली. दुपारी दोनच्या सुमारास गडाच्या कोकणकड्याजळ आली असता, पाठीवरील बॅग बाजूला काढत तिने कड्यावरून अचानक खाली उडी मारली. सोबत असलेल्या गाईड समोरच हे घडले.

त्याने पाचनई गावचे सरपंच भास्कर बादड यांना सदर घडलेली घटना कळवली असता बादड यांनी पोलीस स्टेशनला व रेस्क्यु समनवयक ओंकार ओक यांना माहिती कळवली. ओक यांनी त्वरित लोणावळ्याचे गणेश गिध, नाशिकचे दयानंद कोळी यांना माहिती दिली.

गणेश गिध यांच्या नेतृत्वा खाली सोमवारी (ता. ८) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कोकणकड्यावरून दीपक विषे व तनया कोळी हे दोघे जण रोपच्या सहायाने १४०० फुट खोल दरीत स्ट्रेचर व विक्टिम बॅग घेऊन खाली उतरले. १८०० फुट उंचीचा कोकणकडा रॅपलिंग करणे हे मोठ्या जिकिरीचे काम, उन्हाळ्यात उतरणे तर अजूनच थरारक काम असते.

अनेक संकटाना सामोरे जात दीपक विषे व तनया कोळी हे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मृतदेहा जवळ येऊन पोहचले. त्यांनी छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह शवबॅगेत भरला. कोकणकड्यावर असलेल्या रेस्क्यु टीमच्या सदस्यांनी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान मृतदेह वरती खेचला व राजूर पोलीसांच्या ताब्यात दिला.

खाली उतरलेले दीपक विषे व तनया कोळी हे खाली बेलपाडा या गावातुन राजुर या गावात पोहचले. राजुर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व रेस्क्यु टीम मधील सदस्यांचे पोलीस अधिकाऱ्यांनी आभार मानत कौतुक केले तसेच आर्थिक सहकार्य केले.

नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशनचे दयानंद कोळी, तनया कोळी,अभिजीत वाघचौरे, अजय पाटील, टीम डेला ऍडव्हेंचरचे गणेश गीध, आकाश अंभोरे, सुधीर उंबरे, शैलेश शेलोकर, विनायक गोपाळे, दर्शन देशमुख सह्याद्री एडवेंचर मुरबाडचे दीपक विशे,टीम शिवगर्जनाचे सतीश बोबडे, तन्मय माने, भरत जाधव, टीम रक्षा सामाजिक विकास मंडळाचे सुमित गुरव, गडाच्या परिसरातील स्थानिक कमळू पोकळा, रवी झाडे, नामदेव बांडे, गोरख भारमल, भास्कर बादड, दत्ता भारमल, किरण भारमल व सखाराम भारमल, आत्माराम भारमल यांनी अवनी भानुशाली हीचा मृतदेह वर काढण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

राजुर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार व्ही. के. मुंढे व एस. आर. पवार हे पुढील तपास करत आहेत.

दोन पानी सुसाईड नोट लिहत जीवन प्रवास संपवीला...

आई बाबा मला माफ करा मी हे खुप विचार करून करत आहे. मला माफ करा मला कोणीही मदत करू शकले नाही. खुप काही सांगायचे आहे, पण सांगु शकत नाही. शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. मी प्रार्थना करते कि जगात कोणीहि असे पाऊल उचलु नये. या भावनिक शब्दांची दोन पानी सुसाईड नोट अवनीच्या बॅगेत सापडली असुन आत्महत्या करण्याचे खरे कारण अज्ञात असल्याचे समजते.

मुरबाडचे दीपक विषे व नाशिकच्या तनया कोळीचे विशेष साहस.

या दोघांनी अवघड असा कोकणकडा १४०० फुट खाली उतरत हे असाध्य कार्य करून दाखविले.विषे यांच्या पाठीशी रेस्क्युचा अनुभव असुन त्यांनी सह्याद्रीच्या या परिसरातील अनेक बचाव मोहिमांमध्ये सहभाग नोंदविला आहे. तनया कोळी या वीस वर्षीय तरुणीने देखील कमालिचे साहस दाखवत या बचाव मोहिमेत स्वतः खाली उतरली.

हरिश्चंद्रगडावर घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असून सह्याद्रीत ह्या पद्धतीचे अपघात होणे चिंताजनक आहे. ह्या प्रकारांमुळे रेस्क्यू टीम व सरकारी यंत्रणेवर खूप दबाव पडतो तसेच अश्या अपघातांमधली बॉडी रिकव्हरी करणे अत्यंत कठीण असते. ह्या संपूर्ण मोहिमेत नाशिकच्या वीस वर्षीय तनया कोळी ने दाखवलेले धाडस व आत्मविश्वास कौतुकास्पदच आहे. डेला अडव्हेंचरच्या गणेश गिध तसेच आपली सामाजिक बांधिलकी ओळखून पोलीस यंत्रणा व सर्व सहभागी स्थानिक गाईड्स ह्यांचे योगदान अमूल्य असून हे प्रकार पुन्हा होऊ नयेत हीच मनापासून इच्छा आहे.

- ओंकार ओक, ट्रेकर व रेस्क्यू समन्वयक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT