MNGL Gas Sakal
पुणे

MNGL Gas Supply : कोथरूडमध्ये 'एमएनजीएल' गॅसचा पुरवठा अचानक बंद झाल्याने नागरिकांचे झाले हाल

कोथरूड मध्ये एमएनजीएल च्या पुरवठ्यामध्ये अडथळा आल्याने अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

सकाळ वृत्तसेवा

कोथरूड - कोथरूड मध्ये एमएनजीएल च्या पुरवठ्यामध्ये अडथळा आल्याने अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. श्रावणी सोमवारचा पहिला दिवस असल्याने, नैवेद्य, प्रसाद, जेवणासाठी जो काही बेत केला होता, तो शिजवण्यासाठी गॅस उपलब्ध नसल्याने आता खायचे काय असा प्रश्न अनेक कुटुंबांना निर्माण झाला. ग्राहक तक्रार निवारण केंद्र येथे वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळत नव्हता.

कोथरूड मधील शिल्पा सोसायटी, गिरीजा सोसायटी, सुफल सोसायटी, स्नेह पॅरडाइज, रामबाग कॉलनी, लीला पार्क सोसायटी आदी भागात एमएनजीएल च्या पुरवठ्यामध्ये संध्याकाळी तीन तासांहून अधिक काळ पुरवठा बंद होता.

दिलीप कानडे म्हणाले की, मधुमेह असल्याने मला जेवणाच्या वेळा पाळाव्यात लागतात. पण इंधन पुरवठा न झाल्याने समस्या निर्माण झाली. ही परिस्थिती माझ्या सारख्या अनेकांना सहन करावी लागली. बील भरायचे मेसेज पाठवतात तसे, पुरवठा बंद होणे, गळती आदी बाबत ग्राहकांना तातडीने कळवण्याची व्यवस्था करायला हवी.

सुफल सोसायटी मधील अविनाश गवांदे म्हणाले की, तक्रार करण्यासाठी ग्राहक निवारण केंद्रावर बरेचदा प्रयत्न करूनही फोन लागत नव्हता त्यामुळे लोकांना पुरवठा सुरळीत होण्यासाठी नेमकं किती वेळ लागणार आहे हे समजत नव्हतं. अशावेळी तातडीने संदेश पाठवता येईल अशी व्यवस्था करायला हवी. म्हणजे लोक पर्यायी व्यवस्था करू शकतात.

एनसीएलच्या कामामुळे वाहिनीला गळती लागल्याने पुरवठा थांबवण्यात आल्याचे काही नागरिकांना ग्राहक तक्रार निवारण केंद्रावरून समजले. दीड तास हा प्रश्न सुटेल असे त्यांना आश्वासित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT