Koyata Attack On Police In Pune Esakal
पुणे

Koyata Attack On Police In Pune: आता पोलिसही असुरक्षित! पुण्यात 'API'वर कोयत्याने हल्ला

Koyata Attack On Police: पुण्यात भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सहायक पोलिस निरीक्षकावर टोळक्याने कोयत्याने हल्ला केला आहे.

आशुतोष मसगौंडे

गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात कोयता गँगनी दहशद माजवली आहे. पोलिसांनी केलेल्या विविध कारावयांनंतरही यामध्ये कोणताही बदल होताना दिसत नाही. अशात आता रामटेकडी परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. वानवडी पोलिसांच्या हद्दीत असलेल्या भागत भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सहायक पोलिस निरीक्षकावर टोळक्याने कोयत्याने हल्ला केला आहे.

या हल्ल्यात जखमी झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव रत्नदीप गायकवाड असून, त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसला आहे. त्यांना उपचारासाठी आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रामटेकडी परीसरात दोन टोळक्यात भांडण सुरू होते. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. गायकवाड ओरीपींना पकडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांच्यावर रेकॉर्डवरील गुन्हेगार निहाल सिंग याने कोयत्याने हल्ला केला.

यावेळी त्याच्याबरोबर राहुल सिंग नावाचा रेकॉर्डवरील गुन्हेगारही घटनास्थळी होता. तोही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यांनी पोलिसांवर याआधीही हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत.

गेल्या आठवड्यात तरुणावर कोयत्याने वार

दरम्यान गेल्या आठवड्यात एरंडवणे भागात पोलिसांत दिलेली तक्रार मागे घे असे म्हणत तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार केले होते. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून पुण्यात कोयता गँगचा हैदोस सुरू आहेत. यामध्ये पोलिसांनी कडक पाऊल उचलूनही कोणताही बदल झाल्याचे चित्र नाही. कारण हे कोयता गँगवाले गुन्हेगार गाड्यांची तोडफोड, नागरिकांना दमदाटी आणि आता थेट पोलिसांवर कोयत्याने हल्ला करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

Pune Fake Voting: पुणे शहरातील सर्व ८ मतदारसंघांत फेक मतदान! कोथरुड अन् वडगावशेरीत सर्वाधिक

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

SCROLL FOR NEXT