कुरकुंभ - बकरी चोरीचा संशय घेतल्याचा राग मनात ठेवून 9 जणांच्या गटाने तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळावारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी संपत शेलार यांचे भाऊ पंढरीनाथ यांच्या मळद येथील घरासमोरील 1 फेब्रुवारी 2021 रोजी बकरी चोरीचा संशय घेतला होता. याचा राग मनात धरून हल्ला करण्यात आला. कुरकुंभ इथल्या मळदचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असलेल्या संपत शेलार यांच्यासह आणखी एकाला मारहाण केली. याप्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संपत शेलार यांनी पोलिसात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी कुरकुंभ येथील हॉटेल श्रीनाथ समोर स्विफ्ट ( एमएच. 05, एक्स. 9075 ) गाडी व दोन दुचाकीवरून तरुण आले. या तरुणांनी मळद तंटामुक्त समितीचे संपत शेलार व बाळकृष्ण रघुनाथ गिरमे यांना लाकडी दंडूके , पाईपने मारहाण केली. दोघेही या माराहाणीत गंभीर जखमी झाले.
पोलिसांनी याप्रकरणी चंदू हिवरकर ( रा. दत्तवाडी शिर्सुफळ, ता. बारामती, जि. पुणे ), सुनील जाधव ( रा. गुजुबावी, ता. बारामती, जि. पुणे ) व इतर सात जणांविरूद्ध जमाव जमून लाकडी दंडूके, प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.