Mucormycosis Sakal
पुणे

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची पुरेशा सुविधेअभावी हेळसांड

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या शहर आणि जिल्ह्यात वाढत असतानाही या आजाराचे निदान आणि उपचाराची व्यवस्था अजूनही नियोजनाच्या पुढे सरकलेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची (Mucormycosis Patients) संख्या शहर आणि जिल्ह्यात वाढत असतानाही या आजाराचे (Sickness) निदान आणि उपचाराची (Treatment) व्यवस्था अजूनही नियोजनाच्या पुढे सरकलेली नाही. उपचार महाग असतानाही सरकारी रुग्णालयांत (Government Hospital) सुविधांच्या अभावामुळे रुग्ण खासगी रूग्णालयात (Private Hospital) दाखल होत आहेत. दुसरीकडे ज्या खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, तिथेही औषधांचा पुरवठा (Medicine Supply) सुरळीत होत नाही. पर्यायाने रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत. (Lack of Adequate Facilities for Mucormycosis Patients)

सध्या ससून आणि औंध येथील जिल्हा रुग्णालयात यासंबंधीचे उपचार उपलब्ध आहेत. म्युकरमायकोसिसचे उपचार प्रचंड गुंतागुंतीचे, वेळखाऊ आणि महागडे आहेत. बुरशीने शरीरात प्रवेश केला तर तातडीने उपचार होणे आवश्यक आहे. अशा वेळी निदान, शस्त्रक्रिया आणि आवश्यक औषधे देण्यास उशीर झाल्यास त्याचा गंभीर परिणाम रुग्णावर होतो. काही प्रसंगी हे जिवावरही बेतू शकते. असे असतानाही प्रशासनाकडून कासवाच्या गतीने पावले उचलण्यात येत असून, जे काही उपाययोजना होत आहेत, त्यातही अनागोंदी दिसते. महापालिकेच्या वतीने दळवी रूग्णालयात उपचार सुरू करण्यात येणार आहे. मात्र त्याच्या कार्यवाहीची प्रगती बुरशीच्या वाढीच्या वेगापेक्षा खुपच कमी आहे.

हे आहे वास्तव

  • उपचाराचा खर्च खुपच जास्त असल्याने काही रूग्ण उपचार न घेताच परततात

  • उपचारासाठी केवळ इंजेक्शन नव्हे, तर निष्णात सर्जनची आवश्यकता

  • दीर्घकाळ चालणाऱ्या या उपचारांत एका रुग्णाला १५०च्या वर इंजेक्शनची गरज भासते

  • जिथे गरज आहे, तिथे इंजेक्शनचा पुरवठा कमी

  • सरकारच्या योजनांमध्ये खासगी रुग्णालयांचा समावेश नाही

  • योजनांची घोषणा झाली आहे; पण प्रत्यक्षात किती जणांना लाभ मिळाला, हे अजूनही अनुत्तरीत

दळवी रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर सुरु करण्याचे काम आठवडाभरात होईल. त्यासाठीचे वैद्यकीय साहित्य आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाले आहेत. त्याआधी म्युकरमायकोसिसचे रुग्ण आणि संशयितांची यादी तयार करून त्यांच्यावर प्राधान्यक्रमानुसार उपचार केले जाणार आहेत.

- डॉ. किरण भिसे, दळवी रूग्णालय, म्युकरमायकोसिस विभाग

म्युकरमायकोसिसचे ७८ रूग्ण गेल्या आठवड्याभरात ससूनमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी दोन दिवस पुरेल एवढा इंजेक्शनचा साठा आहे. ससून रूग्णालयात बुरशीच्या उपचारासाठी निष्णात असलेले डॉक्टर आहेत. त्याचबरोबर आम्ही इतरही डॉक्टरांना या उपचारासंबंधी प्रशिक्षण देत आहे. यासंबंधीची आदर्श कार्यप्रणाली आम्ही विकसित केली आहे.

- डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

रुग्णांची संख्या (२० मेपर्यंत)

  • ७ महापालिकेच्या रूग्णालयांत

  • १४३ शहरातील खासगी रूग्णालयांत

  • ७८ ससून रूग्णालयात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT