पुणे : कोरोना काळात आरोग्य सेवा अधिकाधिक बळकट करण्यावर भर देणाऱ्या सुज्ञ पुणे महापालिकेत तज्ज्ञ डॉक्टर मात्र उपेक्षितच आहेत. या तज्ज्ञांना पालिका गलेलठ्ठ पगार मोजत असतानाही त्यांना दुय्यम दर्जाची कामे दिली जात आहेत. या डॉक्टरांना शस्त्रक्रिया, बाल रुग्णालय अशी कामे देण्याऐवजी त्यांना बाह्यरुग्ण विभाग, लसीकरण अशी कामे दिली आहेत.
पालिकेने गेल्या महिन्यात अनेक डॉक्टरांना बढती दिली आहे. यामध्ये स्त्रीरोग, बालरोग, भूलतज्ज्ञांसह सर्जन, प्लॅस्टिक सर्जरी करणाऱ्या डझनभर तज्ज्ञांचा (वर्ग १) समावेश आहे. त्यांच्या दिमतीला दीडशे (वर्ग २) डॉक्टर आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांना दरमहा दीड लाखापेक्षा अधिक पगार आहे. एवढा पगार मोजूनही पालिका त्यांच्याकडून दर्जेदार आरोग्य सेवा करून घेण्यापेक्षा त्यांची नेमणूक बाह्यरुग्ण विभाग, लसीकरणासाठी केली आहे.
महापालिकेची कमला नेहरू, राजीव गांधीसारखी मोठी रुग्णालये आहेत. कोरोना संसर्गाच्या अगोदर महापालिकेने आरोग्य विभागातील अनेक रिक्त पदे भरली. अनेक डॉक्टरांना गेल्या महिन्यात बढती देण्यात आली. यामध्ये या डॉक्टरांना वर्ग एकचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या तज्ज्ञ डॉक्टरांनी महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयांत सेवा बजावणे अपेक्षित आहे. मात्र त्यांची अद्याप नियुक्ती केलेली नाही.
कमला नेहरू व राजीव गांधी रुग्णालयात शस्त्रक्रिया विभाग आहेत. या ठिकाणी कुटुंब नियोजनापासून इतर शस्त्रक्रिया होतात. उपनगरांमध्येही दवाखाने व प्रसूतिगृहे आहेत. याठिकाणी बाह्यरुग्ण विभाग व बालकांचे लसीकरण केले जाते. तर काही ठिकाणी क्षयरोग, दंतचिकित्सा, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे उपक्रम राबविले जातात.
''स्त्रीरोग तज्ज्ञांना माताबाल संगोपन, बालरोग तज्ज्ञांना बालकांचे आजार व त्याबाबत घ्यावयाची काळजी, तर सर्जन व प्लॅस्टिक सर्जन यांना जन्मजात काही व्यंग असणाऱ्यांवर शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात नियोजन व कृती अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोविडचा संसर्ग संपल्यानंतर प्रत्येकाला जबाबदारी दिली जाणार आहे.''
- डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका
महापालिकेतील डॉक्टरांनी बाहेर प्रॅक्टीस करून नये म्हणून त्यांना पगाराच्या ३५ टक्के अधिक रक्कम ‘नॉन प्रॅक्टीस अलाउन्स म्हणून दिली जाते. त्यासाठी डॉक्टरांकडून बंधपत्र लिहून घेतले जाते. मात्र डॉक्टरांवर नियंत्रण व लक्ष ठेवणारी यंत्रणाच नाही. त्यामुळे अनेक तज्ज्ञ डॉक्टर व इतर वैद्यकीय अधिकारी स्वत:च्या रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयात प्रॅक्टीस करीत असल्याची चर्चा आहे.
५० दवाखाने
२०प्रसूतिगृहे
२० तज्ज्ञ डॉक्टर
१५० वैद्यकीय अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.