येरवडा: शहरातील सर्वच सिलिंडर वितरण करणाऱ्या वितरकांकडे तोलन काट्यांचा अभाव आहे. त्यामुळे सिलेंडरमध्ये गॅस किती वजनाचा आहे, हे कळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. तर अनेक गॅस वितरकांनी त्यांच्या कार्यालयातील तोलन काटे गेली अनेक वर्षांपासून मुद्रांकन व तपासणीच करून घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे.
शहरात भारत व हिदुस्तान पेट्रोलियम कंपनीसह इंडेन कंपनीचे गॅस सिलेंडर वितरक आहेत. वितरक अनेक ठिकाणी होम डिलीव्हरी करतात. मात्र त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे तोलन उपकरणेच नसल्याच्या तक्रारी नागरीकांनी केल्या आहेत. त्यामुळे सिलेंडरमध्ये अचून वजनाचे गॅस असल्याची खात्री देता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर कित्येक ग्राहकांना गॅस सिलेंडर वजन करून घेतले जाते याची माहितीच नाही.
वैध मापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक सीमा बैस म्हणाल्या, ‘‘ स्वयंपाकाचा गॅसचे सिलेंडर स्विकारताना त्याचे सील व्यवस्थित असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. सिलेंडर स्विकारण्यापूर्व कर्मचाऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या तोलन उपकरणांवर वजन तपासून पाहणे आवश्यक आहे. रिकाम्या सिलेंडरचे वजन व गॅसचे निव्वळ वजन सिलेंडरवर दर्शविऱ्यात आलेले असते. तसेच पावतीवर दर्शविलेले वजन पडताळून पाहता येते.’’
वैधन मापन शास्त्र विभागाच्या कायद्या प्रमाणे तोलन उपकरणांची तपासणी व मुद्रांकन न केल्यास त्यांच्यावर खटला दाखल होऊ शकतो. तसेच त्यांच्यावर दंडाची कारवाई होऊ शकते. मात्र आता पर्यंत किती वितरकांवर दंडात्मक कारवाई केली याची आकडेवारी मात्र वैध मापन शास्त्र विभागाकडे नसल्याचे समजते.
गॅस सिलेंडर वजन करून देणे बंधनकारक आहे. वैधमापन शास्त्र विभागातर्फे विशेष अभियान घेऊन वितरकांकडील तोलन यंत्राची तपासणी केली जाते. सिलेंडरचे वजन करून न दिल्यास ग्राहकांनी नियंत्रण कक्ष ०२२- २२६२२०२२ व ०२०-२६६८३१या दूरध्वनी क्रमाकांवर तक्रारी करण्याचे आवाहान वैधमापन शास्त्र विभागाने केले आहे.
‘‘हरिगंगा सोसायटीत गेली अनेक वर्षांपासून भारत व हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस सिलिंडर वितरीत केले जातात. मात्र कधीही कर्मचाऱ्यांच्या हातात तोलन काटे दिसले नाहीत. आता माहिती झाल्यामुळे गॅस सिलेंडर वजन करून घेणार आहे.’’
- उषा जाधव, रहिवासी, हरिगंगा सोसायटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.