Lake Dry Sakal
पुणे

Lake Dry : वरुणराजाची कृपा होईना, बळिराजा पडला चिंतेत; आंबेगाव तालुक्यात पाझर तलाव पडले कोरडे

सकाळ वृत्तसेवा

महाळुंगे पडवळ - आंबेगाव तालुक्यात जुलै महिना संपत आला, तरी जोरदार पाऊस होत नाही. महाळुंगे पडवळ, चास-ठाकरवाडी, लौकी व अन्य पाझर तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

चास-ठाकरवाडी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात एकूण पाच छोटे व तीन मोठे बंधारे आहेत. बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्टात येऊन बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील शेतीच्या पाण्याचा काही प्रमाणात प्रश्न निर्माण झाला आहे.

जुलै महिना निम्मा संपला तरी ओढ्या-नाल्यांना पाणी आले नाही. पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास पाणी टंचाई जाणवेल, असे सरपंच आशा खंडू पारधी यांनी दिली.

जुलै महिना संपून गेला तरी महाळुंगे पडवळ परिसरात जोरदार पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे अद्याप ओढ्यांना पाणी आले नाही. परिणामतः महाळुंगे पडवळ ते नारायणगाव रस्त्यालगत ठाकरवाडी येथे असलेला पाझर तलाव कोरडा आहे.

पावसावर अवलंबून असणारी पिकेही सुरू लागली आहेत. पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास नजीकच्या काळात पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल, अशी माहिती हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर व माजी सरपंच चंद्रकांत जाधव यांनी दिली.

टाकेवाडी येथे म्हसोबा महाराज मंदिरानजीक असलेल्या बंधाऱ्यात अल्पपाणी शिल्लक आहे. चिखलेमळा, पाटीलवाडी, ठाकरवाडी, शिंदेवस्ती व वायाळवस्ती या वाडीवस्तीवरील नागरिकांची शेती या बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून आहे.

अल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने ऐन पावसाळ्यात पिकांना देखील पाणी कमी पडत आहे. लौकी येथील विविध ठिकाणी असलेले सहा बंधाऱ्यात अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. लवकरच हे बंधारे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.

आंबेगाव तालुक्यातील चास, ठाकरवाडी, महाळुंगे पडवळ, साकोरे, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, नांदूर, कळंब, लौकी, चांडोली बुद्रुक आदी गावांत जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे ओढ्या-नाल्यांवरील बंधारे व पाझर तलाव कोरडे आहेत. डोंगर भागात पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाची उगवण झाली नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट काही शेतकऱ्यांवर आले आहे.

- बन्सी शेगर, शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT