Lalit Patil Escape Case Esakal
पुणे

Lalit Patil Escape Case: ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करणारे दोन पोलिस बडतर्फ; अमली पदार्थ प्रकरण

Lalit Patil Escape Case: ससून रुग्णालयातून अमली पदार्थांचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ माफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत करणाऱ्या दोन पोलिसांना पोलिस आयुक्तांनी बडतर्फ केले आहे.

सनिल गाडेकर

पुणे, ता. ४: ससून रुग्णालयातून अमली पदार्थांचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ माफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत करणाऱ्या दोन पोलिसांना पोलिस आयुक्तांनी बडतर्फ केले आहे. या प्रकरणात पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते.

पोलिस हवालदार आदेश शिवणकर आणि पिरप्पा बनसोडे अशी बडतर्फ केलेल्या दोघांची नावे आहेत. ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. चौकशीत ते दोषी आढळल्याने त्यांना सरकारी सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा आदेश दिला. या गुन्ह्यात ससून हॉस्पिटलमधील कर्मचारी, पोलिस कर्मचाऱ्यांसह १५ जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

गुन्हे शाखेने तीन हजार १५० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. तर पाटील आणि त्याला फरार होण्यास मदत करणाऱ्या सचिन वाघ या दोघांवर पोलिसांकडून तब्बल दोन हजार ६०० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पाटील याने पळून जाण्यापूर्वी तीन महिने आधीपासूनच पसार होण्याच्या प्लॅन केला होता. तो पळून गेला त्यावेळी त्याचा चालक सचिन वाघ त्याच्यासोबत होता.

यांना झाली होती अटक

या गुन्ह्यात ससून येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण दादासाहेब देवकाते, येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे, ललितच्या मैत्रिणी अर्चना किरण निकम (वय ३३) आणि ॲड. प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा रोहित माहिरे (वय ३९, दोघीही रा. नाशिक), ललितचा भाऊ भूषण पाटील (वय ३४ ), साथीदार अभिषेक बलकवडे (वय ३१, सर्व रा. नाशिक), रोझरी एज्युकेशन ग्रुपचा भागीदार विनय अऱ्हाना (वय ५०, रा. कॅम्प) आणि त्याचा चालक दत्तात्रेय डोके (वय ४०, रा. हडपसर) यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली होती.

तीन तास उशिराने दिली माहिती

ललित पाटील याला ससून रुग्णालयात एक्स-रे काढण्यासाठी नेण्यात आले होते. तेथून तो पळून गेल्यानंतर त्याची माहिती नियंत्रण कक्षाला तब्बल तीन तास उशिराने देण्यात आली होती. दोन्ही पोलिस कर्मचारी ललित पाटील सोबत एक्स-रे काढण्यासाठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. या शिवाय घटनेची माहिती तत्काळ नियंत्रण कक्षाला दिली असती तर पळून गेलेल्या ललित पाटीलला पकडता आले असते. मात्र, या दोघांनी वरिष्ठ अधिकारी तसेच नियंत्रण कक्षास न कळविल्यामुळे ललित पाटील याला पळून जाण्यास संधी मिळाली, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT