Leopard 
पुणे

इनामगावात ज्येष्ठ महिलेवर बिबट्याचा हल्ला 

दत्ता कदम

मांडवगण फराटा (जि. पुणे) : इनामगाव (ता. शिरूर) येथे आज दुपारी तीन वाजता भरवस्तीत बिबट्याने एका ज्येष्ठ महिलेवर घरात शिरून हल्ला केला. यामध्ये हिराबाई बबन खळदकर (वय 70) गंभीर जखमी झाल्या आहेत. खोलीतून अंगणात येताना काही कळण्याच्या आतच बिबट्याने खळदकर यांच्यावर हल्ला चढविला अन्‌ त्यांच्या छातीवर बिबट्याने पंजाचा वार केला. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताला जबर जखम झाली आहे. 

या वेळी शेजारील महिलांनी आरडाओरडा केला; तसेच येथील अतुल रावसाहेब माचाले यांनी बिबट्याला हुसकावून लावले त्यामुळे खळदकर यांचे प्राण वाचले. कुटुंबीयांनी उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ. मनोज भोसले व डॉ. सुनील पवार यांनी तातडीने उपचार सुरू केले. शुक्रवारी दुपारी दोन वाजता याचठिकाणी बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून पाळीव कुत्रे उचलून नेले; तर आज खळदकर यांच्यावर हल्ला केल्यानंतरही आज पुन्हा चार वाजता बिबट्या ग्रामस्थांना येथील परिसरात दिसला.

शिरूरच्या पूर्व भागात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. वनविभागाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. अनेक ठिकाणी पिंजरा लावूनही बिबट्याचा वावर कमी होत नाही. वनविभाग नुकसानभरपाई देत आहे; परंतु बिबट्या असाच माणसांवर हल्ला करू लागला, तर लोकांना एकटे घराच्या बाहेर पडणे मुश्‍कील होईल. वनविभागाने तातडीने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थ करत आहेत. आज घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT