बिबट्या sakal
पुणे

रक्षाबंधनासाठी माहेरी गेलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला

शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

मांडवगण फराटा : वडगाव रासाई (ता. शिरुर) येथील साखराई मळा येथे रक्षाबंधनासाठी (Rakshabandhan) माहेरी आलेल्या महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला (Leopard attack) करुन जखमी केले आहे. दैव बलवत्तर असल्याने महिलेचे प्राण वाचले आहेत.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी मांडवगण फराटा येथील राणी युवराज घाडगे (वय- ४२ वर्षे) या आपल्या माहेरी वडगाव रासाई येथे गेल्या होत्या. रक्षाबंधन कार्यक्रम उरकुन त्या आपल्या मुलासह सासरी घरी जाण्यासाठी रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास निघाल्या होत्या. यावेळी बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप घालुन राणी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात त्यांच्या हाताला बिबट्याचे दात तर कमरेला पंजाची नखे लागून त्या जखमी झाल्या आहेत. मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या भागात आजपर्यंत बिबट्याने गाई, वासरे, शेळ्या, पाळीव कुत्री, रान डुक्कर, ससे यांसारख्या प्राण्यांवर हल्ले केले होते परंतु माणसांवर हल्ला केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा बिबट्या नरभक्षक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यावेळी शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनपरिमंडळ अधिकारी पी. ए. क्षीरसागर, वनरक्षक एस. जे. पावणे, एस. एम. जराड, वनसेवक एन. बी. गांधले, एस. बी. शितोळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. वनविभाग या हल्लेखोर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT